कोरोनाच्या सेवेत अहोरात्र झटणारे 'ते' डॉक्टर म्हणतायेत, रुग्णांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा

doctor
doctor

ठाणे : संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. यातूनच तहान-भूक विसरून दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो वारकरी हे पायी पाडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे वारीरद्द करण्यात आली असली तरी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कोरोना योद्धांमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचा भास होत असल्याचे वारकरी सांगत आहेत. तर मागील तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या सेवेत अहोरात्र काम करणारे वारकरी संप्रदायाचे ह भ प डॉ. प्रसाद भंडारी यांनी तर रुग्णांची सेवा हीच पाडुरंगाची सेवा असे मत व्यक्त केले आहे.

मूळचे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा पाटण गावचे सुपुत्र असलेले डॉ. भंडारी हे अस्थिरोग तज्ञ म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्या कार्यरत आहेत. त्यांचे आजोबा हे त्यांचे आधात्मिक गुरु असून त्यांच्याकडून मिळालेला कीर्तनाचा वारसा डॉ. भंडारी यांनीही जोपसला आहे. त्यांनी दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेतून कीर्तन अलंकार ही पदवी देखील प्राप्त केली आहे. तसेच ते शास्त्रीय संगीत विशारद देखील आहे. 2007 पासून ठाणे, डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी विविध जिल्ह्यांमध्ये ते प्रवचन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी 100 प्रवचन आणि 60 हून अधिक कीर्तने केली असून ते कीर्तनाच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील साम्य याबाबतचे महत्व पटवून देत आहेत. त्यात नुकतेच त्यांनी मागील महिन्यात फेसबुक लाईव्ह कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना या आजाराबाबत जनजागृती करीत लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यांनी अनेकदा एचआयव्ही आणि स्त्री भृह्न हत्या आदि विषयांवर प्रबोधनात्मक कीर्तन व प्रवचन केले आहे. तसेच सत्संग, मंत्रजाप आणि सदभक्ती या तीन गोष्टींचा आपण आचरण केल्यास स्वत:ला अपप्रवृत्तीपासून वाचवू शकतो याबाबत देखील सल्ला दिला.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच हजारो वर्षाची वारीची परंपरा चुकली असल्याने भंडीरी सद्या रुग्णालयात आपल्या कामावर रुजू आहेत. दरम्यान आज वारकरी शरीराने घरी असला तरी तो मनाने मात्र, चंद्रभागेत स्नान करून पंढरीच्या वाळवंटात दिंडी पताका घेवून नाचत आहे, असे म्हणत मी कोरोना रुग्णांची सेवा करत आहे हीच माझ्यासाठी खरी श्रेष्ठ वारी असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले. 

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी रुग्णालयातच काम करत आहे. त्यामुळे मला रुग्णांच्या सेवेतच पंढरीची वारी आणि पांडुरंगाचे दर्शन होत आहे.

-  डॉ. प्रसाद भंडारी, हभप, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय.

the doctor said work for patients is like work for Panduranga

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com