डोंबिवलीत कंपनीतून धुराचे लोट; शहरात एकच खळबळ

मयुरी चव्हाण काकडे
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील हार्बट ब्राऊन या कंपनीतून आज (बुधवार) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अचानक धूर येऊ लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

एमआयडीसीमध्ये पुन्हा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कंपनीमध्ये साफसफाई करत असताना केमिकल कचऱ्याच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

प्रोबेस कंपनीच्या स्फोटाच्या कटू आठवली आजही डोंबिवलीकरांच्या स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरात धुराच्या घटना घडल्या की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आजही एमआयडीसी परिसरातील हार्बट ब्राऊन या कंपनीतून सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास धुराचे लोट परिसरात पसरू लागल्याने एमआयडीसीमध्ये पुन्हा मोठी दुर्घटना झाल्याच्या संशयाने शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस एमआयडीसी परिसरात रवाना झाले.

दरम्यान, परिस्थीतीची पाहणी करण्यासाठी नगरसेवक महेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. कोणत्याही प्रकारचा स्फोट झाला नसून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सवामुळे तसेच लोकलसेवा ठप्प असल्याने बहुतांश कर्मचारी कंपनीत आले नाहीत. कचरा साफ करत असताना रसायनाचा संपर्क कच-याशी आल्याने धूर निर्माण झाला, असे स्पष्टीकरण कंपनीचे तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र साठे यांनी दिले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: dombivli news midc company dust people excitement