esakal | चीनविरोधातील भूमिका 'फेडरेशन ऑफ हॉटेल रेस्टॉरंट'ला अमान्य; वाचा का मांडली अशी भूमिका...
sakal

बोलून बातमी शोधा

hotel

सध्या आमचे लक्ष केवळ आमचा व्यवसाय सुरु करणे व तो व्यवस्थित चालेल याकडे आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत चिनी पर्यटकांवर बहिष्कार घालणे योग्य नाही. मुळात व्यवसायात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे अयोग्य आहे. चिनी पर्यटकांवर बहिष्कार घालावा असे आवाहन करणाऱ्यांच्या तीव्र भावना आम्ही समजू शकतो.

चीनविरोधातील भूमिका 'फेडरेशन ऑफ हॉटेल रेस्टॉरंट'ला अमान्य; वाचा का मांडली अशी भूमिका...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या दांडगाईच्या निषेधार्थ भारतात येणाऱ्या चिनी पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या देऊ नयेत, हे काही संघटनांचे आवाहन 'फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशन'ने अमान्य केले आहे. व्यवसायाला बाधक आणि भेदभावकारक असे हे कृत्य आम्ही करणार नाही, असे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

मोठी बातमी - शिवसेना भवन आता शिवसैनिकांसाठी काही दिवस बंद, कारण आहे..

फेडरेशनचे उपाध्यक्ष गुरुबक्षिषसिंह कोहली यांनी 'सकाळ'कडे ही वस्तुस्थिती स्पष्ट केली. असे करण्यापेक्षा आमचा व्यवसाय व्यवस्थित सुरु करण्यावर तसेच आमच्या व्यवसायाला मदत होईल, अशी काही पावले उचलण्यासाठी सरकारला झोपेतून जागे करण्यावर आमचा भर राहील, असेही ते म्हणाले. काही व्यावसायिकांच्या संघटनांनी चिनी पर्यटकांवर हॉटेलांमध्ये बहिष्कार टाकावा, असे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना उद्देशून नवी दिल्लीत केले आहे. 

वारकऱ्यांची थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'ही' आहे मागणी..

सध्या आमचे लक्ष केवळ आमचा व्यवसाय सुरु करणे व तो व्यवस्थित चालेल याकडे आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत चिनी पर्यटकांवर बहिष्कार घालणे योग्य नाही. मुळात व्यवसायात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे अयोग्य आहे. चिनी पर्यटकांवर बहिष्कार घालावा असे आवाहन करणाऱ्यांच्या तीव्र भावना आम्ही समजू शकतो, पण देशप्रेमापोटी फारतर चिनी मालावर बहिष्कार घालणे एवढ्यापुरतेच ही मोहीम मर्यादित असावी. अतिथी देवो भव: हे आपले ब्रीदवाक्य असल्याने त्याविरोधात आम्ही वागणार नाही. 

महामुंबईतील 'या' क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन; संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी

उद्या समजा पाचशे चिनी व्यक्तींचे शिष्टमंडळ भारतात आले तर कोणी हॉटेलचालक त्यांच्यावर बहिष्कार घालतील, असे मला वाटत नाही. हॉटेल-पर्यटन व्यवसायाला सरकारने साह्य केले नाही, तर चिनीच काय पण कोणाही पर्यटकांना आम्ही भविष्यात सेवा देऊ शकणार नाही, अशी सध्याची अवस्था आहे. एरवीही आम्हाला पर्यटक-ग्राहक मिळवून देणाऱ्या ऑनलाईन पर्यटन साईट ने देखील चिनी पर्यटकांवर बहिष्कार घातला नाही किंवा चिनी पर्यटकांवर बहिष्कार घालावा, असे आम्हाला सांगितले नाही, असेही कोहली म्हणाले.