सरकार पुन्हा तीच चूक करणार? 'त्या' नागरिकांचा मुंबई- पुणे प्रवास

mumbai pune
mumbai pune

मुंबई : लंडनमध्ये अडकलेल्या 325 भारतीयांना घेऊन स्पेशल विमान लंडनमधील हिथ्रो विमानतळावरुन मायदेशी दाखल झालं आहे. केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत हे विमान आज मुंबईत पोहोचलं. रविवारी मध्यरात्री दीड वाजता पहिलं विमान मुंबई विमानतळावर दाखल झालं. या विमानातून आलेल्या सर्व प्रवाशांना विविध हॉटेल्समध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. यावेळी या विमानातून पुणे जिल्ह्यातील एकूण 65 प्रवासी देखील आलेत. त्या नागरिकांना पुन्हा एकदा मुंबईहून पुण्याला पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे सरकार पहिल्यांदा केलेली चूक पुन्हा करतंय का? असाच सवाल उपस्थित होतोय.

सरकारनं पुन्हा तीच चूक केली? 

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा शिरकाव पहिल्यांदा पुण्यातूनच झाला. दुबईहून आलेल्या पुण्याच्या दाम्प्त्याला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. हे 
दाम्पत्य दुबईहून मुंबईत दाखल झाले होतं. त्यानंतर त्यांनी मुंबई- पुणे असा टॅक्सीनं प्रवास केला होता. पुण्यात गेल्यावर या दाम्पत्याला कोरोना झाला, तसंच त्यांच्यामुळे टॅक्सी ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण झाली होती. त्या दाम्पत्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले रुग्ण आढळले होते.

दरम्यान आज लंडनहून आलेल्या नागरिकांनाही मुंबईतून पुण्यात पाठवण्यात आलं. त्यामुळे त्यांना 14 दिवस मुंबईत क्वारंटाईन करण्यात काय अडचण होती, असा प्रश्न विचारला जात आहे. एकतर महाराष्ट्रातील कोरोनाबाधिताची आकडेवारी पाहिली असता मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रार्दुभाव आहे. प्रशासनानं आज लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना बसनं पुण्यात पाठवलं. त्यामुळे त्यांना पुण्यात पाठवून प्रशासनानं पुन्हा चूक केली नाही ना? असाच सवाल उपस्थित होत आहे. 

पुण्यात केली क्वारंटाईनची व्यवस्था 

या सर्व प्रवाशांची मुंबई विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर चार बसमधून त्यांची पुण्याकडे रवानगी करण्यात आली आहे. या प्रवाशांच्या क्वारंटाईनची व्यवस्था पुण्याच्या हॉटेल सदानंद रेजन्सी, बालेवाडी- म्हाळुंगे येथे करण्यात आली आहे. लंडनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी आणि यात्रेकरु अडकले होते. त्या सगळ्यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या अडकलेल्या सर्वांनी केंद्र सरकारकडे भारतात परत घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन अखेर केंद्र सरकारनं वंदे भारत मिशन राबवलं आहे. या मिशन अंतर्गत लंडनहून पहिलं विमान आज सकाळी मुंबईत दाखल झालं. 

आज मुंबईत दाखल होणार आणखी तीन विमान 

परदेशात अडकलेले 813 भारतीयांना आज मायदेशात आणले जाईल. लंडनहून पहिले विमान दाखल झालं. त्यानंतर सिंगापूर आणि मनीला येथून दोन विमाने मुंबईत आज रात्रीपर्यंत दाखल होतील. सिंगापूरहून 243 प्रवाशांना घेऊन निघालेलं एक विमान दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला मुंबईत पोहोचेल. तर तिसरे विमान मनीलाहून 241 प्रवाशांना घेऊन येणार विमान रविवारी रात्री 11 वाजता मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल.

The government will make the same mistake again, the Mumbai-Pune journey of traveling citizens

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com