
विरार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने कोणालाही कामावरून काढू नये, असे आदेश असतानाच वसई-विरार महापालिकेतील नवीन आयुक्त गंगाधरण डी. यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यातच आयुक्तांनी 30 वर्षे सेवा दिलेल्या आणि निवृत्त होण्यासाठी काही दिवस राहिलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने कामगार संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.
पालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभागातील 130 ठेक्यावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याचे आदेश दिले असून कर्मचाऱ्यांचा राहिलेला पगार लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हे कामगार कोरोना संकटात जिवाची पर्वा न करता फेरीवाल्यांवर कारवाई, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गरीबांना अन्नधान्य देणे, बाधित परिसर बंद करणे आदी कामे करत आहेत. सध्या बांधकामे बंद असल्याने हा विभाग बंद करण्यात आल्याचे कारण देऊन कामगारांना कामावरून काढण्यात आले आहे.
या कामगारांबरोबरच आयुक्तांनी पालिकेच्या सेवेत 30 वर्षाहून अधिक सेवा दिलेल्यांना कामगारांवर निलंबनाची कारवाई केल्याने संताप व्यक्त होत आहे. कोणतीही खातर जमा न करता चुकीच्या माहितीआधारे निलंबनाची कारवाई झाल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. निलंबित केलेल्यांमधील भूषण पाटील 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. राजेंद्र पाटील डिसेंबरमध्ये, तर अशोक मांद्रे पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.
कोरोनाच्या लढाईत शहरात सुरु असलेली फवारणीही आयुक्तांनी बंद केली आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याचा आरोप नगरसेवक सुदेश चौधरी यांनी केला आहे. दरम्यान याबाबत आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
नवीन आयुक्तांची पूर्ण माहिती न घेता आमच्या संघटनेच्या सदस्यांना निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या मध्ये ज्यांची 30 वर्षापेक्षा जास्त सेवा झाली असून काही दिवसावर त्यांची निवृत्ती आली आहे. आतापर्यंतच्या काळात त्या कर्मचाऱ्यांवर सेवेत कसूर केल्याचा कोणताही ठपका नसतानाही कारवाई झाल्याने ती मागे घ्यावी.
- सुधाकर संखे, अध्यक्ष, वसई-विरार महापालिका अधिकारी-कर्मचारी संघटना
शाबासकीऐवजी शिक्षा...
अतिक्रमण विभागातील मजुरांना आज कामावरून कमी केले. पण तेच मजूर कोरोना संकटात जीवाचे दान करून दिवस-रात्र काम करत होते. त्यांना शाबासकी एवजी घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हा कोणता न्याय, असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे.
Ignoring the orders of the Chief Minister along with the Center
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.