जुहू प्रकरण : दारूच्या नशेत असलेल्या 'त्या' महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई

अनिश पाटील
Friday, 14 August 2020

मुंबईतील जुहू येथे महिला पोलिस दारूच्या नशेत स्थानिकांसोबत असभ्यरितीने वागून वाद घातल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबई  : मुंबईतील जुहू येथे महिला पोलिस दारूच्या नशेत स्थानिकांसोबत असभ्यरितीने वागून वाद घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या महिला पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्रुतिका (नाव बदललं आहे) 24 जुलैला जुहूच्या इस्कॉन मंदिरात सकाळी कार्यरत होत्या. त्यादिवशी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर त्यांनी घरी जाणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तसं न करता त्या जुहूतील रुईया पार्क येथील मोरागांव येथे जाऊन दारू प्यायल्यात. दारूच्या नशेत त्यांचे तिथल्या एका नागरिकांशी क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. महिला हवालदाराने  नागरिकांशी भांडणही केले. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

महिला पोलिसांच्या या असभ्य वर्तनाची गंभीर दखल  वरिष्ठांनी  आता घेतली आहे. खाकीमध्ये असताना अशाप्रकारे नागरिकांशी असभ्य वर्तन करणे पोलिस दलाच्या शिस्तीस अशोभनीय असल्याचा शेरा वरिष्ठांनी नोंदवत त्या महिला हवालदाराला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश आता दिलेले आहेत. 

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

-- आजोबांच्या वक्तव्यावरून दुखावलेले पार्थ पवार लवकरच घेणार मोठा निर्णय?

-- देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये भाजप निवडणूक प्रभारी? केंद्रीय नेत्तृत्व सोपवणार मोठी जबाबदारी?

-- गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्यांची संपूर्ण यादी

-- ठाणेकर तयारी करा! उद्यापासून 'या' वेळेत सुरु होतील दुकानं, असे असतील नियम

-- तटकरे, मुंडे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या भेटीला, मुंबईत राजकीय खलबतं जोरात... 

( संपादन - सुमित बागुल )

juhu case drunk lady police havaldar suspended from duty read full news

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: juhu case drunk lady police havaldar suspended from duty read full news