सात पँन्ट, सात शर्ट घालून लाखोंचा गंडा घालणारा गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा गजाआड

कल्याणः एका प्लेसमेंट कंपनीचे नाव वापरून परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याला बाजार पेठ पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद तारिक खान असे या भामट्याचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा गजाआड

कल्याणः एका प्लेसमेंट कंपनीचे नाव वापरून परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याला बाजार पेठ पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद तारिक खान असे या भामट्याचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.

पोलिसांनी तारिक कडून २६ पासपोर्ट, विविध कंपन्यांचे लेटरहेड, कागदपत्रे तसेच 1 लाख 29 हजार रुपयाची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, तारिक कंपन्यांच्या नावाने पम्प्लेट छापून ते वितरित करत गरजू लोकांची फसवणूक करायचा त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा यांनी एकावर एक असे सात शर्ट पॅन्ट अंगावर चढवले होते. एवढेच नव्हे तर 3 अंडरवेयर घातल्याचे दिसून आल्याने पोलिसही हैराण झाले. याबाबत त्याला विचरले असता त्याने मला थंडी ताप आल्याचे सांगितले. परंतु, आपण पकडले जाऊ नये, म्हणून त्याने हा पराक्रम केल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी बाजारेपठ पोलिस स्थानकात प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीचे मालक प्रकाश बोडके यांनी खान भाई नावाच्या इसमाने आपल्या कंपनीचा लोगो वापरत परदेशात नोकरीचे आमिष दाखवत पाच जणांना मिळून लाखोंचा गंडा घातल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारी नुसार पोलिसांनी खान भाई नावाच्या इस्माविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला. या आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहिती नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे आवाहन उभे ठाकले होते.

या आरोपीला जेरबंद करण्यासाठी अपर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलिस उपायुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पासलकर यांनी पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पवार, गुन्हे अन्वेषण विभागचे पोलिस नाईक विलास मोरे, सुरेश पाटील यांचे पथक नेमून शोध सुरु केला  मोबाईल नंबर मिळाल्याने या नंबरच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर या खान भाई पर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

तारिक खान हा बिहार मधील नवादा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने कल्याण, नवी मुंबई, मुंबई परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना दुबई, सौदी, कुवेत येथे नोकरीचे आमिष दाखवत तसेच व्हिसा काढून देण्याचे आमिष दाखवत अनेक जणांना लाखोंचा गंडा घालत असल्याचे उघड झाले आहे. त्याने किती जणांची फसवणूक केली याचा तपास सुरु आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: kalyan news police arrested thief in kalyan