कल्याण: महिला स्पेशल बससाठी शिवसेना, भाजप आमने-सामने

रविंद्र खरात 
बुधवार, 26 जुलै 2017

केंद्रात, राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपाची युती असली तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यानमधील वाद आज ही काही मिटलेला नाही.  एक वर्षापूर्वी तत्कालीन केडीएमटी सभापती भाऊ चौधरी यांनी कल्याण आणि डोंबिवली मध्ये भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून निवडणूक आचारसंहिता कारण सांगत कोणतेही गाजावाज़ा न करता महिला स्पेशल बसेस सुरु केल्या.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम प्रशासनाने एक वर्षापूर्वी कल्याण रिंगरूट महिला विशेष बस सुरु केली असताना , भाजपा महिला पदाधिकारीच्या पाठपुराव्यामुळे ही बस सुरु केल्याचे सांगत घोषणाबाजी करत नारळ फोडत मंगळवार रात्री आठ वाजता उद्घाटन सोहळा पार पडला, श्रेयासाठी वाटेल ते शिवसेना भाजपा मध्ये चढाओढ लागली आहे. मात्र उद्घाटन सोहळ्यात एका महिला कार्यकर्तीला मोह आवरता आला नाही तिने चक्क डायव्हर सीटचा ताबा घेतल्याने तब्बल 10 मिनिटाने उशिरा बस सुरु झाल्याने बस मध्ये चढलेल्या महिला प्रवाश्याचे हाल झाले.

केंद्रात, राज्यात आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना भाजपाची युती असली तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यानमधील वाद आज ही काही मिटलेला नाही.  एक वर्षापूर्वी तत्कालीन केडीएमटी सभापती भाऊ चौधरी यांनी कल्याण आणि डोंबिवली मध्ये भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून निवडणूक आचारसंहिता कारण सांगत कोणतेही गाजावाज़ा न करता महिला स्पेशल बसेस सुरु केल्या. बसेस सुरु झाल्या मात्र महिला प्रवासी वर्गाचा प्रतिसाद न मिळाल्याने त्या बसेस बंद करण्यात आल्या. त्याऐवजी सर्वासाठी बस सुरु ठेवण्यात आले, तब्बल एक वर्षानंतर भाजपा महिला पदाधिकारी वर्गाचा पाठपुरावा आणि भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांच्या प्रस्ताव नुसार महिला बस सुरु झाला असल्याचे सांगत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मंगळवारी रात्री साडे सात वाजता कल्याण पश्चिम दीपक हॉटेल जवळ कल्याण रिंगरूट महिला स्पेशल बस चा घोषणा बाजी करत नारळ फोड़त उद्घाटन करण्यात आले. भाजपा पालिका गटनेते वरूण पाटील, वैशाली पाटील, परिवहन सदस्य सुभाष म्हस्के, कल्पेश जोशी, हेमा पवार, पुष्पा रत्नपारखी, प्रेमनाथ म्हात्रे,  संजीवनीताई पाटील, रक्षंदा सोनावणे, साधना गायकर, श्वेता झा, राजाभाऊ पातकर आदी पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.

भाजपा गटनेते वरुण पाटील यांनी आपल्या भाषणात महिला पदाधिकारी वर्गाचे कौतुक केले. त्यांच्या पाठपुरावा मुळे आज महिला स्पेशल बस सुरु झाल्याच्या दावा आपल्या भाषणात केला. यावेळी पेढ़े ही वाटप झाले, तदनंतर महिला कार्यकर्त्यांनी बस मध्ये बसल्या यावेळी महिला प्रवासी वर्गाचा विसर पडला. कार्यकर्त्याची संख्या पाहता अनेकांना बस मध्ये उभे राहून प्रवास करावा लागला तर अनेकांनी गर्दी पाहुन बस ऐवजी रिक्षा मध्ये बसून घर गाठले. दूसरीकड़े फोटो साठी एका महिला पदाधिकारीला मोह आवरता आला नाही चक्क बस च्या डायव्हर सीटचा ताबा घेवून फोटो काढू लागली. यामुळे 7 वाजुन 50 मिनिटला सुटणारी बस 8 वाजुन 10 मिनिटला रवाना झाली यात सर्व सामान्य महिला प्रवासी वर्ग हैरान झाल्या यामुळे श्रेयासाठी काही पण अशी चर्चा रंगली होती.

शिवसेना - भाजपा मध्ये मतभेद 
शिवसेना भाजपाची पालिका , परिवहन समिती मध्ये सत्ता असताना महिला स्पेशल बस उद्घाटन सोहळयाला केवळ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते तर शिवसेना पालिका पदाधिकारी आणि परिवहन समिती सभापती , सदस्य नसल्याने दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे समोर आले . 

शिवसेनेला श्रेयाची गरज नाही , महिलासाठी विशेष बस एक वर्षापूर्वी सुरु झाली होती. आज मला किंवा पालिका मधील शिवसेना पदाधिकाऱ्याना आमंत्रण नसल्याने आम्ही गेलो नाही तर भाजपा परिवहन सदस्यांची दुटप्पी भूमिका आहे. सभागृहात एक, बाहेर एक आहे, बस सुरु झाली असताना उद्घाटन कश्यासाठी असा सवाल करत परिवहन चे उपन्न वाढीसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी व्यक्त केले.

एक वर्षा पूर्वी बस सुरु झाल्याचे मान्य करत त्यावेळी भाजपा श्रेय मिळू नये म्हणून काही पदाधिकाऱ्यानी बस सुरु केली मात्र आमच्या महिला पदाधिकारी वर्गाचा पाठपुरावा आणि माझा प्रस्ताव मुळे बस सुरु झाली असून शहरातील महिलाना माहित होण्यासाठी आज उदघाटन सोहळा आयोजित केल्याची माहिती भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: kalyan news Shiv Sena-BJP dispute