Manik Varma
Manik Varma

किराणा घराणाच्या गायिका 'माणिक' वर्मा यांची 95 जयंती युट्युब चॅनेलवर साजरी

मुंबई : आईकडून मिळालेल्या वारशाची किंमत मला जरा उशिरा कळली अशी खंत भारती आचरेकरांनी व्यक्त केली. आईच्या म्हणजेच गायिका माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा देत 'त्या सावळ्या तनुचा ' हे आईचे आवडते गाणे या भारती आचरेकर यांनी गाऊन दाखविले.

माणिक वर्मा हे नाव ओठावर आले की आठवतात काही सुरेख गाणी; ‘अमृताहुनी गोड नाव तुझे देवा’ हे गाणे ऐकावे तर फक्त त्यांच्याच आवाजात! किराणा घराण्याची परंपरा भावसंगीताच्या साथीने त्यांनी पुढे नेली. माणिक वर्मा यांच्या 95 व्या वाढदिवसानिमित्त प्रसाद महाडकर व वंदना गुप्ते ,राणी वर्मा यांच्या ‘सिस्टर कन्सर्न एंटरटेनमेंट’ संस्थेने’ अमृताहुनी गोड’ या माणिक वर्मा यांच्या 95 व्या जयंती वर्षारंभानिमित्त विशेष कार्यक्रमाची निर्मिती शनिवारी ‘जीवनगाणी युट्युब चॅनेल’च्या माध्यमातून केली होती

सर्वप्रथम मधुरा वेलणकर यांनी माणिक ताई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख रसिकांना निर्मळ, नादमय,सर्वसमावेशक ही विशेषणे वापरून करून दिली. माणिक वर्मा यांच्या कलेचा वारसा त्यांच्या तीन लेकींनी समर्थपणे पुढे नेला आहे; राणी वर्मा यांनी गायनात, वंदना गुप्ते यांनी अभिनयामध्ये तर भारती आचरेकर यांनी गाणे व अभिनय या दोन्ही क्षेत्रांमध्ये नेला. यावेळी त्यांनी आई बद्दलच्या आठवणी जागवल्या. 

आपल्या बहिणीची आठवण सांगताना माणिक ताई यांचे बंधू श्रीकांत दादरकर म्हणाले, "बालगंधर्व शैली आपल्या गळ्यातून तंतोतंत उमटविण्यासाठी ताईने खूप मेहनत घेतली; त्यामुळेच बालगंधर्वांची नाट्यपदे एच एम व्ही ला पुनर्मुद्रित करता येऊ शकली.” या कार्यक्रमामध्ये, बाळासाहेब ठाकरे, पु ल देशपांडे यांच्या सारख्या दिग्गजांनी  माणिक वर्मांशी निगडित ज्या गौरवास्पद  आठवणी काढल्या आहेत त्यांचा ही समावेश करण्यात आला आहे. पु लं च्या शब्दांना अतुल परचुरे व सुनील बर्वे यांनी उजाळा दिला आहे तर माणिक ताई यांची गाणी भालजी पेंढारकर यांची सून मीनाक्षी, मुग्धा वैशंपायन व ओंकार दादरकर यांनी गायली होती.

Kirana Gharana singer Manik Verma's 95th birth anniversary celebration on YouTube channel

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com