
कुणाल कामरा 'नया भारत' नावाचा एक नवीन स्टँडअप स्पेशल शो घेऊन परतला आहे. याच शोमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे आता कुणाल कामरा अडचणीत सापडणार आहे. या व्हिडिओत कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावर वक्तव्य केले आहे. यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर एक गाणं बनवलं आहे. या गाण्यातून त्यांच्यावर टीका केली आहे. यामुळ आता वातावरण तापलं आहे.