पालघर जिल्ह्यात मॉन्सूनचे दमदार आगमन

नीरज राऊत
रविवार, 25 जून 2017

जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पूर्व मॉन्सूनच्या सरी सातत्याने पडल्याने शेतकर्‍यांची भाताची पेरणी व रेऊ पद्धतीने लावणी केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते.

पालघर - मॉन्सूनचे पालघर जिल्ह्यात दमदार आगमन झाले असून, गेल्या 10-12 दिवसांचा कोरडा काळ संपला. पावसाच्या आगमनाने जिल्ह्यातील नद्या दुधडी भरून वाहू लागल्या असून दुपार पेरणीचे संकट टळले आहे.

जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पूर्व मॉन्सूनच्या सरी सातत्याने पडल्याने शेतकर्‍यांची भाताची पेरणी व रेऊ पद्धतीने लावणी केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते.

24 जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. अनेक ठिकाणी विजेच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या भरून वाहू लागल्या. तसेच खोलगट भागामध्ये पाणी साचल्याचे प्रकार घडले. झाडे उमळून पडल्याने झाडांच्या फांद्या तुटल्याने अनेक गावांमध्ये वीज प्रवाह खंडीत झाला होता. शेतांमध्ये पाणी साचल्याने खोळंबलेली शेतीच्या कामांना पुन्हा आरंभ होणार आहे.

आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात तलासरी तालुक्यात सर्वाधिक 464.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याबरोबरीने वाडा (326) विक्रमगड (312.5) जव्हार (208.5) मोखाडा (211.9), डहाणू (176.2) पालघर (146.1) तर वसई येथे 70.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीएसएनएल ची ओएफसी नादुरुस्त झाल्याने दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती. मात्र सुट्टीचा दिवस असल्याने या मुसळधार पावसाची विद्यार्थी व नोकरवर्गाला विशेष झळ पोहोचली नाही. आज समुद्रामध्ये या हंगामातील सर्वांत मोठे उधाण असल्याने नद्यांचे पाणी ओसरण्यास विलंब झाला व नदी लगतच्या भागात पाणी साचल्याचे प्रकार घडले.

धामणी धोरण भरले
कडवास धरणाला दरवाजे नाहीत म्हणून पाण्याचा विसर्ग 15,000 क्युसेक ने चालू आहे. अजून कोणत्याही गावांना धोका नाही. पण पाऊस असाच चालू राहिल्यास होऊ शकतो. अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभियंता नि. शा. दुसाने यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
ताडोबा बफर क्षेत्रात धामण सापांचे रंगले प्रणय
मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प
मावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​

Web Title: monsoon rain in Palghar district