ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची प्राणज्योत मालवली

टीम ई सकाळ
रविवार, 2 जुलै 2017

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मूत्रपिंड निकामी झाल्याने ते आजारी होते. 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मूत्रपिंड निकामी झाल्याने ते आजारी होते. 

अभिनयाशिवाय लेखक, अनुवादक व निर्माते म्हणूनही तोरडमल यांनी आपली ओळख निर्माण केली होती. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग रंगभूमीवर झाले. या नाटकातील प्राध्यापक बारटक्के हे तोरडमल यांनी साकारलेलं पात्र रसिकांच्या पसंतीस उतरलं. त्यांनी कादंबरी, नाटक, चरित्र असेही लेखन केले. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या कादंबऱ्यांचा अनुवादही त्यांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीनंतर त्यांची तब्येत आणखी खालावली. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना आत्यंतिक वेदना झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

ते शुक्रवारी संध्याकाळपासून बेशुद्धावस्थेत होते, तसेच ते प्रतिसाद देत नसल्याचेही सांगण्यात आले. ते गेल्या काही काळापासून लोकांमध्येही फारसे मिसळत नव्हते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रवर्य यांनी शनिवारी त्यांच्या वांद्रे येथील घरी उपस्थिती लावली. नाट्यसृष्टीमध्ये तोरडमल हे मामा या नावाने म्हणून ओळखले जात. 

■ ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट

Web Title: mumbai news actor madhukar toradmal passed away