'शहापूरच्या' ढोल ताशांचा 'आव्वाज' घुमणार 'राजधानीत' ! 

मयुरी चव्हाण काकडे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पथकाचे व्हिडिओ आणी तसेच  एका हिंदी  वाहिनीवरील केलेल्या सादरीकरणाची दखल घेऊन  सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक हर्ष पुंडकर आणी  तबला वादक नरहरी सर यांनी  पथकाला दिल्लीचे   निमंत्रण दिले आहे. पथकाकडून सामाजिक बांधिलकीही जपली जाते.
सुमेध जाधव, पथक प्रमुख. माहूली गर्जना, शहापूर. 

कल्याण : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावंर येऊन ठेपले  असल्याने सर्वत्र  उत्साह ओसांडून वाहात आहे. त्यात महाराष्ट्रातील  गणेशोत्सव म्हटला की   ढोल ताशा पथकांचे  लयबद्ध आणि शिस्तबद्ध सादरीकरण सर्वांनाच भुरळ पाडते. देशाची राजधानी  असलेल्या दिल्लीलाही  या  ढोल ताशाच्या ठेक्याने मोहिनी घातली असून  ठाणे  जिल्ह्यातील शहापूर येथील 'माहुली गर्जना'  ढोल ताशा पथकाला यंदाच्या गणेशोत्सवात थेट  दिल्लीहून बोलावणे आले आहे. त्यामुळे  हे पथक  राजधानीत  गर्जना करण्यासाठी सज्ज झाले आहे. 

नाशिक आणि पुणे शहरातील ढोल ताशा पथकांची ख्याती तर सर्वश्रुत आहे मात्र, शहापूर सारख्या  ग्रामीण भागातील ' माहुली गर्जना'  पथकाने 'हम भी कुछ कम नही' हे सिद्ध केले आहे.  दिल्लीचे मंत्री पियुष गोयल  यांच्याकडे पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन होत असल्याने  विशेष आकर्षण म्हणून बाप्पाच्या आगमनासाठी हे पथक  वादन करणार आहेत.  पांढरा शुभ्र सदरा-लेंगा, त्यावर बंडी, डोक्यावर फेटा, गांधी टोपी, मुलींच्या नाकात नथ,  नऊवारी साडी आणि कपाळावर चंद्रकोर, मुलांच्या कपाळावरही साजेसा टीळा किंवा मग चंद्रकोर अशी  अस्सल मराठमोळी  पारंपारिक वेशभूषा  परिधान करून  माहुली गर्जना पथक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडविणार आहेत. 

पथकामध्ये आदिवासी मुला-मुलींचाही समावेश आहे. प्रत्येक पथके आपली वेगळी छाप सोडण्यासाठी नवनविन ताल बसवत असतात. हिंदी चित्रपटाच्या गाण्यांमधील  म्युझिक  घेऊन त्याला खास  ढोल ताशाच्या संगीताचा तडका देऊन  स्वतः:चे अनोखे  ताल हे   ढोल ताशा पथक  बसवत असल्याने  त्यांच्या वादनातील वेगळेपण  सर्वांना आकर्षित करते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

 

Web Title: mumbai news kalyan dhol tasha in delhi