जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जून्या कसारा घाटातील मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या लतिफवाडी व जव्हार फाटा दरम्यान असलेली दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शहापूर : जुन्या कसारा घाटात आज (रविवार) सकाळी सहाच्या सुमारास मोठी दरड कोसळून वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जून्या कसारा घाटातील मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या लतिफवाडी व जव्हार फाटा दरम्यान असलेली दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण मुंबईहुन नाशिक कडे जाणारी वाहतूक एक तास ठप्प झाली होती, त्यातच आज रविवार असल्याने इगतपुरी आणि कसारा घाटातील पावसाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने मुंबईहुन येणाऱ्या गाड्याची संख्या जास्त होती.

या घटनेची माहिती समजताच कसारा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. पण पावसाळ्या अगोदर दरड कोसळू नये म्हणून उपाय योजना करणे आवश्यक होते. पण ती बसविली नसल्याने दरड कोसळण्याचा प्रकार पुन्हा झाला. दरड कोसळू नये या साठी येथे संरक्षक जाळी बसवणे आवश्यक असतानाही ती बसवलेली नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची वाट पहिली जात आहे का, असा संतप्त सवाल वाहन चालक करीत आहेत. दुपारी दोन पर्यत दरड पूर्ण हटविली जाईल, असे सांगण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Mumbai news landslide in kasara ghat shahpur area