मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णसंख्या 20 हजारांवर

सलग तीन दिवस शहरातील रूग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे नोंदविण्यात आली आहे.
Crowd
CrowdANI

मुंबई - मुंबईत आज 20,318 नवीन कोरोना रुग्णांची (Covid Cases In Mumbai) नोंद करण्यात आली असून 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या शहरात 1,06,037 इतके सक्रिय रूग्ण आहेत. (Covid Active Cases In Mumbai) दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या झापाट्याने वाढ होत असल्याने काहीशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सगल तिसऱ्या दिवशी मुंबईतील रूग्णसंख्येने 20 हजांरांचा टप्पा पार केला आहे. (Mumbai Records 20, 318 New Covid Cases On Saturday )

आज मुंबईत सहा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 1,257 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांपैकी 16,661 इतक्या रूग्णांना कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. सध्या मुंबईतील रिकव्हरी रेट 86 टक्क्यांवर नोेंदविण्यात आला असून, रूग्ण संसर्गाचा दर 47 दिवसांवर गेला आहे. (Corona Discharge Cases In Mumbai). शुक्रवारी देशाच्या आर्थिक राजधानीत 20,971 इतक्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती, तर सहा जणांचा मृत्यू झाला होता.

रूग्णालयात दाख होणाऱ्यांचे प्रमाण कमी - टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जालन्यात सांगितले की, महाराष्ट्रात (Maharashtra) कोविड-19 च्या रुग्णांमध्ये (Covid Cased In Maharashtra) नक्कीच वाढ झाली आहे. असे असले तरी, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे आणि रुग्णांना ऑक्सिजनची (Oxygen Support For Covid) गरज देखी तुलनेने कमी भासत आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध किती आणि कसे लावायचे याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठरवतील असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra State Health Minister Rajesh Tope)

Crowd
Explainer: आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे असतात निर्बंध

कोरोनाचा (Covid-19) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनला (Omicron) आतापर्यंत कमजोर मानले जात आहे. कदाचित गेल्या वर्षीच्या डेल्टा (Delta) व्हेरिएंटपेक्षा हा ओमिक्रॉन कमी प्राणघातक असल्याचे मानले जात आहे. परंतु, जर एखाद्याने कोरोनाची लस (Covid Vaccine) घेतली नसेल, तर त्याच्यासाठी ओमिक्रॉन खूप मोठे नुकसानकारक ठरू शकते. मुंबईतील (Mumbai) आकडेवारी याचीच पुष्टी देत आहेत. मुंबईत ज्यांना ऑक्‍सिजन (Oxygen) सपोर्टवर ठेवणे आवश्‍यक आहे अशा कोरोनाची लागण झालेल्या बहुतेकांनी लस घेतलेलीच नाही. बृहन्मुंबई (Brihanmumbai) पालिकेच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. (In Mumbai, 96 percent of patients admitted to oxygen beds were not Covid vaccinated)

Crowd
पाच राज्यांतील निवडणुकांचे बिगुल वाजले; सात टप्प्यांमध्ये होणार मतदान

शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे समन्वयक आणि बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. गौतम भन्साळी (Dr. Gautam Bhansali) म्हणाले, 'रुग्णालयात दाखल होण्याच्या स्थितीतील लसीकरण केलेले आणि लसीकरण न केलेले रुग्ण आहेत, परंतु ऑक्‍सिजन बेडवर दाखल असलेल्या बहुतेक रुग्णांनी कोविड लसीकरण न झालेले आहेत. घेतली आहे. अशा रुग्णांचे वय 40 ते 50 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. ते म्हणाले की, यावरून प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळणे किती महत्त्वाचे आहे, हे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com