मुंबईकरांनो तयारीला लागा, 'या' दिवशी मुंबईत दाखल होणार मान्सून

rain.
rain.

मुंबई : सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. 1 जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरित भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. याचवेळी हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात काही बदल झालेत. यंदा मान्सून 1 जूनलाच दाखल होणार असून यात कोणाताही बदल नसणार आहे. पण काही राज्यांमध्ये मान्सूनच्या प्रवासाची वेळ बदलली आहे.

मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. त्यानुसार, मान्सून कोलकाता आणि मुंबईत 11 जून, तर दिल्लीत 27 जूनला दाखल होईल.

स्कायमेटनं दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून 3 ते 7 दिवस लवकर किंवा उशिरानं येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही 15 जुलैऐवजी 8 जुलैला मान्सून दाखल होईल. त्याचप्रमाणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशातील परतीच्या पावसाची तारीख 15 ऑक्टोबर असेल. यात काही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जूनला दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यंदाचा मान्सून 29 सप्टेंबर ऐवजी 8 ऑक्टोबरपर्यंत असेल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. 

असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. 

भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज IMD ने आधीच वर्तवला आहे. मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही संकेत आहेत.

Mumbaikars get ready, the monsoon will arrive in Mumbai on this day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com