"राष्ट्रीय बाल स्वास्थ्य'मुळे  शालेय विद्यार्थ्यांना नवजीवन

File Photo
File Photo

मुंबई : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या वर्षभरात अंगणवाडीतील 64 लाख 71 हजार मुलांची; तर एक कोटी 21 लाख शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. गत वर्षभरात तीन हजार मुलांवर हृदयशस्त्रक्रिया झाल्या असून या योजनेमुळे शालेय विद्यार्थ्यांना जीवदान मिळाले आहे.

मुलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे दोन कोटी मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली आहे. अंगणवाडी स्तरावर सहा वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलांची वर्षातून दोन वेळा; तर शासकीय व निमशासकीय शाळांमधील सात ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. बालकांचे वजन, उंची, शारीरिक व मानसिक वाढ, विविध आजारांची तपासणी केली जाते. किरकोळ आजारी बालकांना जागेवर उपचार दिला जातो. गंभीर आजारी बालकांना संदर्भ सेवा दिली जाते. अतिविशिष्ट उपचार आवश्‍यक असणाऱ्या बालकांना या योजनेतून तसेच महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, स्वयंसेवी संस्थेमार्फत उपचार दिले जातात. 

राज्यात या योजनेंतर्गत 1109 पथके कार्यरत आहेत. बृहन्मुंबईसाठी 55 पथके मंजूर करण्यात आली आहेत. आदिवासी जिल्ह्यांमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्याकरिता 31 पथके कार्यरत आहेत. या पथकांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, एक ए. एन. एम. आणि एक औषधनिर्माता यांचा समावेश आहे. आरोग्य तपासणीचे गावनिहाय वेळापत्रक शिक्षण, महिला बाल विकासाच्या विभागाच्या समन्वयाने तयार केले जाते. 

या योजनेंतर्गत जन्मजात बहिरेपणा (क्वॉक्‍लिअर इम्प्लान्ट) असलेल्या बालकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. आतापर्यंत 136 मुलांवर अशा शस्त्रक्रिया झाल्या असून जन्मजात बहिरेपणावरील शस्त्रक्रियेसाठी साधारणतः पाच ते सहा लाख रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. या योजनेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी साडेपाच लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून दिले जातात. शिवाय त्यात पुढील अडीच वर्षांच्या पाठपुराव्याचादेखील समावेश असून तो मोफत दिला जातो. हर्निया, हायड्रोसील, क्‍लेफ्ट लीप, क्‍लेफ्ट पॅलेट आदीसारख्या शस्त्रक्रियादेखील केल्या जात आहेत. 

1219 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया 
गेल्या वर्षी 2018-19 मध्ये अंगणवाडीतील 64 लाख 71 हजार 267 (92 टक्के) मुलांची; तर एक कोटी 21 लाख 24 हजार 428 (95 टक्के) शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक हजार 219 मुलांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे; तर आठ हजार 30 मुलांवर अन्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ज्या मुलांना वैद्यकीय उपचाराची आवश्‍यकता होती, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. जानेवारी 2020 अखेर अंगणवाडीमधील 45 लाख 21 हजार 726 मुलांची; तर एक कोटी एक लाख 66 हजार शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. जानेवारी अखेर एक हजार 846 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे; तर 13 हजार 370 मुलांवर अन्य शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

राज्यात या योजनेंतर्गत हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी 22 खासगी रुग्णालये सहभागी झाली आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, औरंगाबाद, सांगली आदी शहरांमध्ये ही खासगी रुग्णालये असून तेथे मुलांवर शस्त्रक्रिया, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, ने-आण करण्याची व्यवस्था मोफत केली जाते. ही योजना राज्यात 2013 पासून सुरू असून आतापर्यंत 16 हजार 595 हृदय शस्त्रक्रिया; तर 60 हजार 940 अन्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
- राजेश टोपे,
आरोग्यमंत्री 

newlife to School Students by National children health programe

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com