एक व्हॉट्सअॅप मेसेज अन् नोकरीवर कुऱ्हाड; 'या' कंपनीचे 2000 कर्मचारी बेरोजगार

unemployment
unemployment

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या आर्थिक पडझडीतून सावरण्यासाठी अनेक कंपन्यांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबले आहे. इंडिया बुल्स या वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीने 2000 कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना हा निर्णय व्हॉट्सॲपवरून कळवण्यात आला. आणखी अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार कायम आहे.

लॉकडाऊनमुळे  कंपनी आर्थिक संकटात सापडल्याचे इंडिया बुल्स व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात 35 टक्के कपात करण्यात आली असून, संचालक आणि उपसंचालक वर्षभर पगार घेणार नाहीत. एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात 5 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे. सध्या इंडिया बुल्समध्ये 26 हजार कर्मचारी असून, 10 टक्के कर्मचारी कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. एवढी वर्षे काम करूनही अशा पद्धतीने काढून टाकल्याबद्दल अनेकांनी समाज माध्यमांवरून संताप व्यक्त केला आहे. 
लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक  कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. बहुतेक कंपन्यांनी यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावली आहे.

नोकऱ्यांवर कुऱ्हाड

  • स्विगी : 1100
  • झोमॅटो : 13 टक्के 
  • ओला : 1400 
  • उबर : 3700
  • शेअर चॅट : 101 
  • थॉमस कूक : 350
  • एफसीएम ट्रॅव्हल सोल्यूशन : 200

68 टक्के कंपन्यांचे धोरण

सुमारे 68 टक्के कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढायला सुरुवात केली आहे किंवा तसा विचार सुरू केला आहे. जॉब पोर्टल कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर येते. देशातील 25 शहरांमधील 11 क्षेत्रांतील 1124 कंपन्यांशी संपर्क साधून हे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे 73 टक्के कंपन्यांनी वेतन कपात सुरू केली असून, 57 टक्के कंपन्यांनी तात्पुरता उपाय म्हणून कामगार कपातीचा निर्णय घेतला. साधारणत: 21 टक्के कंपन्यांनी दोन वर्षांसाठी कामगार कपात केली आहे. केवळ 32 टक्के कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यटन, विमान वाहतूक, रिअल इस्टेट क्षेत्रे संकटात
लॉकडाऊनचा सर्वांत मोठा आर्थिक फटका विमानसेवा, हॉटेल, पर्यटन, रिअल इस्टेट या क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे याच क्षेत्रांत सर्वाधिक कामगार कपात होण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी नोकऱ्यांची छाटणी सुरूही केली आहे.

रोजगार धोक्यात 

  • रिटेल आणि एफएमसीजी : 49 टक्के 
  • हॉटेल, विमानसेवा, पर्यटन : 48 टक्के 
  • ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग : 41 टक्के 
  • रिअल इस्टेट : 39 टक्के 
  • वीजनिर्मिती : 38 टक्के

Private companies started layoffs  2000 employees of India Bulls unemployed after Ola, Uber

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com