गणेशपुरी येथे पालक मंत्र्यांनी केला खड्डेमय रस्त्यातून प्रवास

दीपक हिरे
गुरुवार, 6 जुलै 2017

वज्रेश्वरी (ठाणे): संपूर्ण राज्यात सुपरिचित असलेल्या ठाणे जिल्यातील वज्रेश्वरी व गणेशपुरी येथील तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्रामध्ये गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज्यांच्या दर्शनासाठी ठाणे जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवाजी चौक ते गणेशपुरी असा खड्ड्यातून प्रवास करून नंतरच स्वामींचे दर्शन घेता आल्याने या रस्त्याची दुरवस्था स्वतः पालक मंत्री यांनी अनुभवली.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे येत्या 9 तारखेला स्वामी नित्यानंद महाराजांचा गुरुपौर्णिमा उत्सव  मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. त्यामुळे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली. मात्र, शिवाजी चौक ते गणेशपुरी रस्ता पार करतांना अनेक खड्डे पार करून व वाहन आदळीत त्यांना 2 किमी रस्ता पार करून दर्शन घेता आले. या प्रकारामुळे येथील रस्ते व सुविधा याची अनुभूती पालकमंत्री यांनी घेतली.

गणेशपुरी रस्ता गेले कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असून या दोन किमी च्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून चिखल तुडवीत गणेशपुरी येथे जावे लागते. या बाबत अनेक वेळा येथील रिक्षा चालक मालक संघटना व प्रवासी तसेच भक्त गण यांनी वारंवार संबंधित विभाकडे तक्रारी केल्या. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आले. या ठिकाणी येणारे नित्यानंद महाराजांचे भक्त गण देशासह परदेशातून देखील येतात. मात्र, येथील रस्ते, वीज पाणी या समस्या मुळे खूप वैतागलेली आहेत. या बाबत कुणीही येथील समस्ये कडे लक्ष देत नाही. नुकतेच अचानक या देवस्थानला भेट देण्यासाठी आलेले पालक मंत्री यांनी या रस्त्याने प्रवास करून अनुभव घेतला आहे. त्यामुळे आत्ता सर्व भाविक व ग्रामस्थ पालक मंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, या रस्त्यांनी प्रवास करून स्वानुभव घेतल्याने गणेशपुरी येथे पोलीस ठाणे येथे भेट देऊन या रस्ता बाबत पालकमंत्रीनी ताबडतोब जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ताबडतोब फोन करून त्वरीत रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, गुरुपौर्णिमा जवळ येऊन ठेपली तरी अजून पर्यंत प्रशासन जागे न झाल्याने ग्रामस्थ मध्ये नाराजी पसरली आहे.

Web Title: thane news eknath khadse travel from a paved road