भिवंडीतील "त्या' दोन ऑस्ट्रेलियन महिलांना कोरोना नाही 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

तपासणीनंतर आरोग्य विभागाकडून स्पष्ट; व्हायरल व्हिडीओने खळबळ

भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील अंजूरफाटा भागातील एका इमारतीत ऑस्ट्रेलिया येथून दोन महिला आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने शनिवारी भिवंडी शहरात खळबळ उडाली होती. पोलिस व महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्धारित पत्त्यावर धाव घेऊन दोन्ही महिलांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

भिंतीवर लिहिली बायकोच्या प्रियकराची माहिती, पण त्या आधीच त्यानं तिला...

विदेशातून प्रवास केलेल्या दोन ऑस्ट्रेलियन महिला भिवंडीतील कामतघर अंजुरफाटा परिसरात राहायला आल्या असून त्यांची मुंबई विमानतळावर रीतसर तपासणी होऊन त्यांना प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खबरदारी म्हणून त्यांनी 14 दिवस होम कोरंटाईन करून राहावयास सांगितले असून तसे शिक्के त्यांच्या हातावर मारण्यात आले, अशी माहिती समाज माध्यमांवर शनिवारी सायंकाळी प्रसिद्ध झाली.

अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

त्यामुळे भिवंडीत खळबळ उडाली होती. याबाबत नारपोली पोलिस व महानगरपालिका आरोग्य विभागाला माहिती मिळताच डॉक्‍टरांचे एक पथक त्यांच्या घरी दाखल झाले. दोन्ही विदेशी महिलांची तपासणी व चौकशी करून त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन्ही महिलांना कोरोना प्रादुर्भावाबाबत माहिती देऊन त्यांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

चुकीच्या व्हिडीओमुळे भीती 
चुकीचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महापालिकेचे शिवसेनेचे माजी उपमहापौर नगरसेवक मनोज काटेकर यांनी त्या परिसरास भेट देऊन नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा असे आवाहन केले. तसेच हा दिशाभूल करणारा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. 

महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

परदेशी प्रवास करून आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती महानगरपालिका आरोग्य विभाग घेत असून अशा व्यक्तींना होम कोरंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 
- डॉ. जयवंत धुळे, प्रमुख, पालिका आरोग्य विभाग

"Those 'two Australian women in Bhiwandi have no Corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Those 'two Australian women in Bhiwandi have no Corona