विक्रोळीतीलं 'या' भागात संपूर्ण 'लॉकडाऊन', रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावासाठी सुरुवातीला वरळी आणि धारावी हे दोन्ही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध झाले. पण या भागात आता कोरोनाचे रुग्ण संख्या कमी झाली असून विक्रोळी, भांडुप, कांजुरमार्ग, मुलुंड, नाहूर या भागात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

मुंबई : कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस नवी उच्चांकी गाठताना दिसतोय. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावासाठी सुरुवातीला वरळी आणि धारावी हे दोन्ही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध झाले. पण या भागात आता कोरोनाचे रुग्ण संख्या कमी झाली असून विक्रोळी, भांडुप, कांजुरमार्ग, मुलुंड, नाहूर या भागात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच आता भांडुप पाठोपाठ विक्रोळीत ही कडक निर्बंध लावण्यात आलेत. विक्रोळीतील दोन भाग पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेत. 

Big Breaking : 'लालबागचा राजा' यंदा विराजमान होणार नाही, मंडळाने घेतला ऐतिहासिक निर्णय

कोरोना रुग्णांचा आकडा अचानक वाढल्यानं प्रशासनानं 5 जुलैपर्यंत विक्रोळी, एस वॉर्डमधील काही भागांत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. या प्रभागात भांडुप, नाहूर, विक्रोळी आणि पवई यांचा समावेश आहे. 

 महत्वाची बातमी : ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीतल्या काही भागांमध्ये दररोज 130 हून अधिक घटना घडत आहेत. 4,381 रुग्णांसह एस वॉर्डमध्ये शहरातील पाचवे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. एस वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी सांगितले, एस वॉर्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा कल वाढता आहे. काल या भागात झोपडपट्ट्या आणि इमारतींमधून 130 रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोर नगरमधले आहेत. 

हे ही वाचा खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानं लोकांची रस्त्यावर ये-जा वाढली आणि याच कारणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. हा भागात कोरोना रुग्ण वाढण्यामागे अनलॉक हे एकमेव कारण आहे. आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई केली असून दुकानदारांना दुकानं बंद करण्यास सांगितलं असल्याच, त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा : शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

धोंडे म्हणाले की, या वॉर्डमधील 15 प्रभाग अधिकाऱ्यांसह कंटेन्मेंट अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या भागात कोरोनाचा प्रसार रोखणं हे एक आव्हान बनले आहे, मात्र इतर अधिकारी अधिकचं कामं आणि अतिरिक्त भार सहन करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एस वॉर्डच्या कार्यक्षेत्रात पवईपासून विक्रोळी - कन्नमवार नगर, कांजुरमार्ग, भांडुप आणि मुलुंडचा काही भाग येतो. तसंच यात एकूण तीन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. एस वॉर्डमधील डबलिंग रेट 24 दिवसांचा आहे, जो मुंबईच्या सरासरीपेक्षा कमी आहे (41). प्रभागातील 75 काही भाग आणि 166 इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोणीही रस्त्यावर कारणास्तव फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचंही अधिकाऱ्यानं सांगितलं. 

नक्की वाचा : मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

भांडुपमध्ये 5 जुलैपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन

पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 5 जुलैपर्यंत वाढविण्यात आलाय. सध्या रुग्णसंख्येत भांडुप मुंबईत चौथ्या क्रमांकावर असून, या भागात दररोज 100 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, मालाड, अंधेरी आणि पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुपमध्ये रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येताहेत. भांडुपमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज 100च्या वर रुग्णांची नोंद होताना दिसतेय.

महत्वाची बातमी : कल्याण-डोंबिवलीत 'या' तारखेपासून लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक सेवांनाच मुभा

संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1.71 टक्के असताना एकट्या भांडुपमध्ये रुग्णवाढीचा दर 3 टक्के आहे. 24 जूनला येथे 103, 25 जूनला 121, 26 जूनला 118 रुग्णांची नोंद झाली. भांडुपमधील रुग्णसंख्या ही 19 जूनला 3,399 होती ती 28 जूनला 4,119 वर जाऊन पोहोचली. या भागात रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी 26 दिवसावर गेला आहे. या कालावधीत भाजीविक्री, फळविक्री, फेरीवाले, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

Vikhroli lockdown the planned implement because of patient rate is increases


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhroli lockdown the planned implement because of patient rate is increases