Navratri : गरब्यासाठी नखशिखांत नटायचंय? मग हे वाचायलाच हवं
Getting ready to dress-up from Head-to-toe : नवरात्री म्हटली की, एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो. एकीकडे आदिशक्तीच्या भक्तीमय वातावरणात सगळे भारावलेले असतात, तर दूसरीकडे तरूणाईमध्ये गरबा फिवर चढलेला असतो.
याच गरब्या फिवरमध्ये अजून रंग भरण्यासाठी आम्ही खास माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला यंदा गरब्याला जाताना नखशिखांत नटायचे असेल तर आता फार फिरफिर करण्याची आवश्यकता नाही. आपापल्या भागात एकाच ठिकाणी तुम्हाला हवे ते सगळे सहज मिळेल. जाणून घ्या.
मुंबई
दादर स्टेशन रोडचे मार्केट आणि ठाण्यातला टिळक रोड हे पारंपरिक कपडे आणि दागिने मिळण्यासाठीचे हक्काचे ठिकाण आहे असे म्हणायला हवे. इथे परफेक्ट ट्रॅडिशनल लूकसाठी आवश्यक सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात.
पुणे
शॉपिंग म्हटले की, पुण्यातला लक्ष्मी रस्ता सर्वात पहिले आठवतो. तुम्हाला जे काही हवे ते या बाजारात उपलब्ध असतेच. कमीत कमी किमतीतही आकर्षक वस्तू ते ब्रँडेड वस्तूंपर्यंत सर्वच मिळते.
कोल्हापूर
महाद्वार रोड हे कोल्हापूरातलं सर्व काही मिळणारं ठिकाण आहे. इथे कपडं, चपला, दागिने एवढेच नाही तर खाण्यासाठीही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
नागपूर
नागपूरमधलं इतवारा बाजार हा होलसेल आणि रिटेल खरेदी करणाऱ्यांचं लाडकं ठिकाण आहे. इथे नवरात्रीच्या कपडंयासाठी डोळे दिपवणारे कलेक्शन बघायला मिळते.
औरंगाबाद
गुलमंडी परिसरातली बाजारपेठ औरंगाबादकरांसाठी मोक्याचं ठिकाण आहे. इथे कपड्यांचे, दागिन्यांचे वैविध्यपूर्ण नमूने बघायला मिळतात.
जळगाव
जळगाव मधलं फुले मार्केट म्हणजे ऑल इन वन ठिकाण आहे. इथे तुम्हाला मोठमोठी होलसेल खरेदीही करता येते. तर रिटेलमध्ये अगदी ५०-१०० रुपयांची वस्तूही उपलब्ध असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.