Navratri: जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेची नवीन पॉवरहाऊस बनतीय एक भारतीय वंशाची महिला

अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा भारतात सुद्धा एक चाहता वर्ग आहे.
कमला हॅरीस
कमला हॅरीससकाळ

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि स्त्रि शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या महिलांबाबत आपण जाणून घेत आहोत. आज आपण अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला देवी हॅरिस यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. कमला हॅरीस हे एक उमदं व्यक्तीमत्त्व आहे. भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरीस यांचा भारतात सुद्धा एक चाहता वर्ग आहे. त्या अमेरिकन वकील असून उत्तम लेखिका आणि राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे.

अमेरीका सारख्या बलाढ्य आणि महासत्ता असणाऱ्या देशात जिथे आजवर राष्ट्रध्यक्ष आणि उपराष्ट्रध्यक्षपदी फक्त आजवर पुरुषच आले तिथे कमला हॅरी या पहिल्या महिला उपराष्ट्रध्यक्षपदी विराजमान होणे ही संपूर्ण जगासाठी आश्चर्याची बाब होती.

कोण आहेत Joe Biden आणि Kamala Harris?

भारतात कमला हॅरीस विषयी चर्चा तेव्हा रंगली जेव्हा त्यांचा भारताशी घनिष्ट संबंध दिसून आला. त्यांची आई भारतीय होती. कमला हॅरीस यांनी त्यांचं लहानपण त्यांच्या आईच्या वडिलांसोबत घालवले त्यांचे आजोबा पी. व्ही. गोपालन हे भारत सरकारचे अधिकारी होते आणि ते झांबिया येथे राहायचे त्यांनी बऱ्याचदा याबाबत उल्लेख ही केलाय.

कमला हॅरीस यांची आई श्यामला गोपालन या पेशाने डॉक्टर होत्या. त्या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक होत्या. त्यांनी आपल्या मुलींचे नाव ही भारतीय ठेवले. श्यामला गोपालन या मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणूनही सक्रिय होत्या ज्याचा थेट प्रभाव कमला हॅरीस यांच्यावर झाला. लॉ चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डेप्युटी डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून काम केले. त्यानंतर त्या फ्रॅन्सिस्कोच्या ड्रिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून कार्यरत राहल्या.

कमला हॅरीस
ॲरिझोनाला कमला हॅरीस यांची साद

२०१६ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करत रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांचा पराभव केला आणि थेट अमेरिकन सिनेटमध्ये कनिष्ठ प्रतिनिधी पदावर निवडून आल्या.  2017 साली त्या खासदार म्हणून निवडून आल्या.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही संपुर्ण देशासाठी चर्चेचा विषय असते. अमेरिकेतील दोन महत्त्वाचे राजकीय पक्ष आहे एक डेमोक्रॅटिक पक्ष तर रिपब्लिकन पक्ष आहे. प्रत्येक निवडणूकीत या दोन पक्षामध्ये चुरस पहायला मिळते.  २०२१ ची निवडणूकमध्ये मोठी रंजिश पाहायला मिळाली होती. पण अखेर रिपब्लीकन पक्षाचे डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे राष्ट्रध्यक्ष पदी निवडून आले. तेव्हा उपराष्ट्रपतीपदी एक नाव समोर आले ते होते कमला हॅरीस यांचे अन् एकच चर्चा रंगली. आज जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेची नवीन पॉवरहाऊस भारतीय वंशाची महिला कमला हॅरीस बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com