आमचे लोक घुसले तर झेपणार नाही ; आमदारांचा ‘रिमोट’ बावड्यात...

Bhima Agricultural Exhibition in  kolhapur marathi news
Bhima Agricultural Exhibition in kolhapur marathi news

कोल्हापूर: गेली १३ वर्षे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करीत आहोत, पण त्यालाही विरोध केला जातो. यंदाही काम सुरू झाले आणि शहराच्या आमदारांनी ते येऊन थांबविण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांचा दोष नाही. कारण, त्यांचा ‘रिमोट’ बावड्यात आहे. तिथे बटण दाबल्याने ते याठिकाणी आले असतील, असा टोला माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे लगावला. 

मी पराभूत झालो; पण दाढी वाढवून फिरलो नाही, अशी टीकाही त्यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. ही सत्ता तीन-चार महिन्यांची आहे, त्यांनी किंवा त्यांच्या चमच्यांनी जास्त उड्या मारू नयेत. आमची सत्ता आल्यानंतर आमचे कार्यकर्ते मागे लागले तर त्यांना ते सहन होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. भीमा कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी श्री. महाडिक बोलत होते. ‘शहराचे आमदार उद्योजक आहेत. शहरात रस्त्यासह अनेक प्रश्‍न गंभीर आहेत. उद्योजकांच्या वीज बिलाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आमदारांनी त्यात लक्ष घालावे. त्यांचेही कधीतरी कार्यक्रम होतील, त्यात आमचे लोक घुसले तर ते तुम्हाला झेपणार नाही, असा इशाराही श्री. महाडिक यांनी यावेळी दिला. 

कार्यकर्त्यांनी आपले उद्योग सुरू केले
गृहराज्यमंत्री पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘‘ते पुन्हा मंत्री झाले, ते नशीबवान आहेत. त्यांना कुठला बाबा, मांत्रिक भेटला, हे माहित नाही; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. फार दिवस ही परिस्थिती रहाणार नाही. दोन-चार महिन्यात आम्ही त्यांनाही दाखवू. सामाजिक काम म्हणून आम्ही प्रदर्शन भरवतो. कारण, आमच्यावर चांगले संस्कार झाले आहेत.  त्यासाठी लाखो रूपये खर्च करतो. ‘गोकुळ’ चा एक रूपयाही आम्ही घेत नाही आणि गरजही पडत नाही; पण त्यावरही आरोप केला जातो.’’

१३ हा आकडा शुभ आहे
माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन १३ वे आहे आणि १३ हा आकडा आम्हाला शुभ आहे, त्यामुळे कोणी कितीही अडथळे आणले तरी हे प्रदर्शन होणारच आहे; पण यातही राजकारण करणे योग्य नाही. शेती, सिंचन, पायाभूत सुविधा अशा कामात पक्षीय जोडे बाजूला ठेवले पाहिजेत. सकारात्मक कामात त्यांनी सहकार्य केले पाहिजे. खंडपीठासाठी आम्ही त्यांची केंद्रीय कायदा मंत्र्यांची भेट घालून द्यायला तयार आहोत. विकासाच्या कामात राजकारण असू नये.’’

माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, ‘‘जिल्ह्यात एवढे मोठे प्रदर्शन भरवणारा धनंजय महाडिक हा एकमेव आहे. गरीबीची जाण असणारा हा नेता आहे. अनेक अडचणी येऊनही त्यांनी कधी गरीबाशी असलेली आपली नाळ कधी तोडली नाही आणि तोडणारही नाही. त्यामुळे टिका करणाऱ्यांची दखल घेण्याची महाडिकांना गरज नाही.’’

हेही वाचा- आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! -

पडल्यावर दाढी वाढवून फिरलो नाही
राजकारण आणि समाजकारण यात फरक आहे. आमचे रणांगण संपले, असे कोणी समजू नये. मी चार निवडणुका लढलो आणि तीनवेळा पराभूत झाले, महादेवराव महाडिक हेही पराभूत झाले; पण म्हणून आम्ही घरातील टीव्ही किंवा हातातील मोबाईल फोडले नाहीत की वर्षभर दाढी वाढवून कोठे फिरत बसलो नाही, असा टोला श्री. महाडिक यांनी लगावला. 

जिल्ह्याची ताकद माझ्याकडेच
आपली उंची आपल्याला माहिती आहे, पण विरोधकांची उंची मोजू नका, ती तुमची चूक असेल, असे धनंजय महाडिक यांना उद्देशून महादेवराव महाडिक म्हणाले. ते म्हणाले, ‘‘हत्ती चालत असतो आणि कुत्री भुंकत असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नाही. सगळ्यांना पुरून उरणारा महाडिक आहे. अजूनही जिल्ह्याची ताकद माझ्याकडे आहे, हे विसरू नका.’’

हेही वाचा- याला मैदान म्हणायचे का?

महाडिकांचा पैरा फेडू
धनंजय महाडिक यांनी भाजपात यायला उशीर केला, पण त्यांच्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्यामुळे पक्षाला मोठे बॅनर तयार झाले. आमचे संघटन मजबूत होते; पण मार्केटींगमध्ये आम्ही कमी पडत होतो. २०२४ च्या निवडणुकीत महाडिकांचा हा पैरा फेडू आणि संसदेत पुन्हा एकदा कोल्हापुरचा आवाज घुमला पाहिजे, यासाठी प्रयत्न करू, असे श्री. हाळवणकर म्हणाले. 

पावती फाडणारेच टोलमागे होते
आंदोलन करायचे तर कोल्हापुरकरांनी, आंदोलनाचे ब्रॅंड अम्बॅसिडर अशी कोल्हापुरची ओळख आहे. रस्ते करून घेतले आणि नंतर टोलला विरोध केला; पण आमच्या सरकारने हा टोल घालवला. अख्खा जिल्ह्याचा टोल गेला; पण ज्यांनी टोलची पावती फाडली तेच यात सामील होते, असा टोला श्री. हाळवणकर यांनी लगावला. त्यानंतर इथले मटण आंदोलनही राज्यभर गाजले. इथल्या आंदोलनाची दखल घेतली जाते, असेही ते म्हणाले. 

तरच फडणीवसांशी तुमची तुलना
नव्या सरकारने बाजार समितीतील शेतकऱ्यांचा हक्का हिरावून घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली; पण प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. आमच्या सरकारने ५१ हजार कोटी रूपये शेतकऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना फसवू नका. तो लाखांचा पोशिंदा आहे. आता जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली तरच तुमची आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना होऊ शकते, असे श्री. हाळवणकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com