पंढरपुरात सायकल वारीचा रिंगण सोहळा

अभय जोशी
रविवार, 25 जून 2017

राज्याचे अन्न व भेसळ विभागाचे उपायुक्त हरीष बैजल यांनी सहा वर्षापूर्वी या सायकल दिंडीला सुरुवात केली. पहिल्या वर्षी आठच जण त्यांच्या सोबत होते. त्यानंतर दरवर्षी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या नाशिक ते पंढरपूर या सायकल दिंडीचे आज येथे आगमन झाले. नदीच्या पैलतीरावर खेडलेकर महाराज मठाच्या प्रांगणात या सायकल दिंडीने मोठ्या उत्साहात विठ्ठलाचा जयघोष करत गोल रिंगणही पूर्ण केले. या सायकल दिंडीचे हे सहावे वर्ष आहे. 

राज्याचे अन्न व भेसळ विभागाचे उपायुक्त हरीष बैजल यांनी सहा वर्षापूर्वी या सायकल दिंडीला सुरुवात केली. पहिल्या वर्षी आठच जण त्यांच्या सोबत होते. त्यानंतर दरवर्षी या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या वर्षी तब्बल साडे पाचशे जण या दिंडीत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये वय वर्षे आठ वर्षापासून 68 वर्षांपर्यंतच्या लोकांचा या दिंडीत सहभाग आहे. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी 470 किलोमीटर अंतर तीन दिवसात पूर्ण केले. विशेष म्हणजे यंदा या दिंडीत पन्नास महिला व चाळीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

आज सकाळी या सायकल दिंडीचे नदीच्या पैलतीरावरील खेडलेकर महाराज मठात आगमन झाले. तिथे "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरीओम विठ्ठला" असा जयघोष करत सायकलींसह रिंगण केले. मोठ्या उत्साहात झालेल्या या रिंगणा नंतर सहभागी महिलांनी सायकली बाजूला ठेवून फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला. 

सामाजिक संदेश
झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्री भृण हत्या करु नका अशा प्रकारचे संदेश असलेले फलक अनेक सायकलींवर लावण्यात आलेले आहेत. नाशिक पंढरपूर मार्गावरील गावागावात सामाजिक प्रबोधन करत ही दिंडी पंढरपूरला आली. दिंडीतील अनेकांनी गर्दीमुळे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन रांगेत उभा राहण्याऐवजी श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे आणि संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या सायकल दिंडीतील अनेक जण ट्रक मध्ये सायकली ठेवून परतीचा प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पालघर जिल्ह्यात मॉन्सूनचे दमदार आगमन
ताडोबा बफर क्षेत्रात धामण सापांचे रंगले प्रणय
मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प
मावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​

Web Title: cycle dindi in Pandharpur