कोल्हापूर: डॉल्बीचा हट्ट धरू नका: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाची भूमिका संवेदनशील आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. यासाठी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत डॉल्बीचा हट्ट धरु नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर : ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाची भूमिका संवेदनशील आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. यासाठी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत डॉल्बीचा हट्ट धरु नका, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

डॉल्बी चालक-मालकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी ते बोलत होते. डॉल्बी मालकांनी दोन बेस व दोन टॉप लावण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. मात्र, पालकमंत्र्यांनी त्याला नकार दिला. कायद्यामुळे डॉल्बी लावताच येणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन साऊंड सिस्टीम लावल्यास कोणतीच अडचण येणार नाही. मात्र, त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईला समोरे जावे लागेल. ध्वनी प्रदूषणाचा कायदा कडक आहे, या कायद्याच्या कचाट्यात अडकू नका. त्यामुळे तुमचे फार मोठे नुकसान होईल आणि त्यावेळी तुम्हाला वाचवायला कोणही येणार नाही. डॉल्बी न लावल्याने जे आर्थिक नुकसान होईल त्याची सर्व भरपाई देवू, असेही पालकमंत्री पाटील यांनी डॉल्बी मालकांना यावेळी सांगितले.

दरम्यान, गेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात 1100 च्या वर मंडळे डॉल्बी न लावता मिरवणूक काढतात. डॉल्बी न लावण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बी न लावण्याची घोषणा केली आहे. कायद्यानुसार त्यामुळे तुम्हाला डॉल्बी लावताच येणार नाही, असे स्पष्ट सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: kolhapur news Do not assume the Dolby system say chandrakant patil