Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

Toll free for four wheelers : चारचाकी वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! कोल्हापूर-आंबोली राष्ट्रीय महामार्गावर टोल माफ करण्यात आला असून तहसिलदारांनी याबाबत माहिती दिली आहे.
Kolhapur ajra Amboli Highway Toll Free

Kolhapur ajra Amboli Highway Toll Free

esakal marathi news

Updated on

Kolhapur Amboli national highway toll waived : आजरा तालुक्यातील घरगुती वापराच्या चारचाकी गाड्यांना टोल माफ केला जाईल. तर व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के मासिक अथवा वार्षिक सवलतीचा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे येथील टोल वसुलीबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व टोलमुक्ती संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची बैठक झाली. तहसीलदार समीर माने प्रमुख उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com