

Kolhapur Ganesh Visarjan
esakal
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाच्या दोनच ट्रॅक्टर व ट्रॉलींनाच परवानगी दिली जाईल. याचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांना मिरवणूक मार्गावर प्रवेश मिळणार नाही, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले. मार्गावर वाहनांची संख्या कमी झाल्यास जास्तीत जास्त मंडळांना मिरवणुकीत सहभाग घेता येईल, यासाठीचा हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ताराबाई रोडवरील १४ मंडळांचे चिठ्ठीद्वारे प्रवेश क्रम निश्चित करण्यात आले.
जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ताराबाई रोडवरील १४ मंडळांचे चिठ्ठीद्वारे प्रवेश क्रम निश्चित करण्यासाठी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची होती. शहर पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या. यावेळी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.
दरम्यान, चिठ्ठीद्वारे निश्चित झालेले मंडळांचे क्रम असे श्री. साई मित्र मंडळ, हिंदवी स्पोर्टस्, चौपाटी मित्र मंडळ, रंकाळा तालीम, रंकाळा टॉवर, साकोलीचा राजा गणेश भक्त मंडळ, शिवाजी तालीम मंडळ, आयरेकर गल्ली, आझाद हिंद तरुण मंडळ (दयावान ग्रुप), उत्तरेश्वर वाघाची तालीम, महाराष्ट्र सेवा मंडळ, कै. उमेश कांदेकर युवा मंच, भोर तालीम, पॉप्युलर स्पोर्टस् क्लब-गुरुवार पेठ, रंकाळावेश तालीम मंडळ, क्रांती बॉईज.
बैठकीतील सूचना अशा मंडळांनी १० बाय १२ फुटांचेच स्ट्रक्चर जोडावे दोन बेस दोन टॉपलाच परवानगी राहणार प्रेशर मिड, लेझरला बंदीच मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, ताराबाई रोडवरील सर्व मंडळांच्या स्ट्रक्चरसह, ट्रॅक्टर ट्रॉलींची तपासणी होणार दोनपेक्षा जास्त ट्रॉली असणाऱ्या मंडळांना मिरवणुकीत प्रवेश नाकारणार यंदाच्या पहिल्या तीन मंडळांना पुढील वर्षी मिरवणुकीत शेवटी प्रवेश आज सायंकाळी पोलिस निरीक्षक लोंढे यांनी पोलिस पथकांसह विसर्जन मार्गाची पाहणी केली. मिरजकर तिकटी, बिनखांबी, पापाची तिकटी, तसेच ताराबाई रोडवर बसविण्यात येणाऱ्या ‘टायमर सिग्नल’ची ठिकाणे अंतिम करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.