कोल्हापुरातील 'ही' तालीम उभारणार मल्लांसाठी वसतिगृह

Motibag Talim Will Develop Hostel For Wrestler In Kolhapur
Motibag Talim Will Develop Hostel For Wrestler In Kolhapur

कोल्हापूर - येथील मल्लविद्येचे केंद्र असणारे मोतीबाग तालीम मल्ल घडवणारे विद्यापीठ होण्याकडे वाटचाल करत आहे. या दृष्टीने पहिले पाऊल आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या चौवार्षिक सभेमध्ये टाकण्यात आले. या वेळी लोकवर्गणीतून 50 लाख निधी उभारून 200 मल्लांसाठीचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या सभेत तालीम संघाने कोल्हापूरच्या कुस्तीला पुन्हा नवी उभारी देण्यासाठीच मानस अधोरेखित केला. या सभेमध्ये विविध ठराव मंजूर केले. त्यात 200 मल्लांसाठी वसतिगृहाची उभारणी करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. कोल्हापूरची ओळख कुस्ती पांढरी अशी आहे. या शब्दाला साजेशी कामगिरी करण्यासाठी येथे विविध प्रयत्न सुरू असतात. आता या ठिकाणी कुस्तीचे विद्यापीठ स्थापन व्हावे, या मानसिकतेने मोतीबाग तालीम परिसरामध्ये वसतिगृह उभारण्यात येणार आहे.

विदेशातील मल्लांनाही कुस्तीची भुरळ

या ठिकाणी अनेक मल्ल कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी येतात. विदेशातील मल्लांनाही येथील कुस्तीची भुरळ आहे, असे असताना या मल्लांसाठी राहण्याची व्यवस्था असणे महत्त्वाची बाब आहे. हे लक्षात घेऊन तालीम संघाने लोकवर्गणीतून मल्लांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यामध्ये स्वतंत्र भोजन कक्ष, स्वच्छता गृह, नीटनेटकी निवास व्यवस्था असणार आहे. 

जगभरात कोल्हापूरची ओळख कुस्तीपंढरी अशी आहे. हा वारसा जपणे महत्त्वाचे आहे. यासोबतच याचा विकास करण्याची जबाबदारीही आपली असून, यासाठी सर्वानी मतभेद विसरून एकजुटीने प्रयत्न करू, असे आवाहन नूतन जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष दीनानाथसिंह व सरचिटणीस ऍड. महादेवराव अडगुळे यांनी केले. तालमीसह कुस्ती खेळाचा विकास, पैलवानांचे करिअर अशा गोष्टीवर सर्वोतोपरी सक्रिय राहण्याची सर्वानी ग्वाही दिली. 

दोडामार्ग तालुका गोव्यामध्ये विलिन करण्याच्या मागणी मागे आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com