नगरः भाळवणी जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक; प्रशासनाचे दुर्लक्ष

सनी सोनावळे
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

शाळेच्या इमारतीची बिकट अवस्था झाली आहे ही केव्हाही कोसळू शकते याकरीता दहा वर्षापासून ग्रामपंचायत व्यवस्थापन समिती पाठपुरावा करीत आहे तरीही जिल्हा परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषद निंबोडी घटनेची पूर्नआवृती होण्याची वाट पहात आहे का?
- बाबाजी तरटे (माजी सरपंच)

टाकळी ढोकेश्वर (नगर): भाळवणी (ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे भिंतीला तडे गेले असल्याने इमारत धोकादायक झाली ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने याबाबत सात्तयाने पाठपुरावा करून प्रस्ताव सादर करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, 1952 साली बांधकाम झालेली ही इमारत 65 वर्षे जुनी झाली आहे सर्व आठही खोल्यांना बाहेरुन व आतून तडे गेल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत त्यामुळे मुलांना वापरण्यास मुलांना बसण्यासाठी धोकादायक झाल्या आहेत. या वर्ग खोल्या नविन मंजूर करण्यात यावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने 16 जून रोजी दिला आहे, अशी माहीती ग्रामविकास अधिकारी संपत दातीर यांनी दिली.

याबाबत जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता बी. डी. काकडे यांनी या इमारतीची पाहणी करून ही इमारत धोकादायक झाली असून यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. निबोंडी घटनेच्या पाश्र्वभूमीवर ही शाळा त्वरीत दुरूस्त न केल्यास प्रशासन अजून एखादी घटना होण्याची घटना वाट पहात आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: nagar news bhalawani zp school building need to work