...तर नगराध्यक्षांनी राजीनामा देऊन घरी बसावे

...तर नगराध्यक्षांनी राजीनामा देऊन घरी बसावे

कराड : येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या येथील पालिकेतील केबिनला टाळे ठोकल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) घडली. नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्व देत नाहीत असा ठपका ठेवत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील नगराध्यक्षा शिंदे यांच्या येथील पालिका केबिनला चक्क टाळे ठोकून त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असा संतप्त पवित्रा घेतला.

आज सकाळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील नगराध्यक्षांना निवेदन देण्यासाठी पालिकेत आले होते. त्यावेळी अध्यक्ष पालिकेत नाहीत,तर भाजप पक्षाच्या कार्यक्रमात गेल्या असल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्याकडून लवकर येण्याबाबत टाळाटाळ होत गेल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पालिकेतील कार्यालयास चक्क टाळे ठोकले. प्रहार संघटनेच्या वतीने, शहरातील विविध भागांतील तसेच वाखान परिसरातील महत्वाच्या समस्यां सोडवण्यात याव्यात या साठी नगराध्यक्षा सौ. शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांना त्याबाबतचे निवेदन देण्याच्या करिता म्हणून हे सर्व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील पालिकेत सकाळी 11 वाजता आले होते. भाजपाच्या वतीने आज येथील तहसील कार्यालयासमोर सध्याच्या राज्य सरकरच्या विरोधात शेतकऱ्यांवर सुरू असणाऱ्या फसवणुकीविरोधात व महिलांच्या अत्याचारात वाढ होत असल्याच्या कारणाने धरणे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हणून नगराध्यक्षा सकाळपासून भाजपच्या सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यामुळे त्या पालिकेत आल्या नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 11 ते 1 वाजे पर्यंत वाट पाहून चक्क नगराध्यक्षांच्या येथील पालिकेतील केबिनलाच टाळे ठाेकले. नगराध्यक्षांना जर शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पक्षाचे काम करावे व घरी बसावे असा इशाराही  संघटनेच्या वतीने या वेळी देण्यात आला.

हेही वाचा :  ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

जरुर वाचा :  सातारा : नगराध्यक्षांसह सात जणांविरुद्ध सावकारीचा गुन्हा

नक्की वाचा :  Video : दमल्या भागलेल्यांना चैतन्य देऊन गेला नागेश्‍वर

अवश्य वाचा : राजे की राजकारणी ? जबाब द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com