साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथक

हेमंत पवार
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): साखर कारखान्यांच्या ऊस वजन काट्यावर शेतकरी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. वजन काटे हे पारदर्शक नाहीत असे म्हणने अनेकदा संघटनांनी साखर आयुक्तांकडे मांडले आहे. त्याची दखल घेवून साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काटे तपासणीसाठी भरारी पथक नेमण्याचे सुचीत केले आहेत. त्यानुसार आता वैद्यमापन शास्त्र, महसुल, पोलिस विभागाचे अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांचे प्रतिनिधी यांचे संयुक्त भरारी पथक नेमण्यात येणार आहे.

कऱ्हाड (सातारा): साखर कारखान्यांच्या ऊस वजन काट्यावर शेतकरी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. वजन काटे हे पारदर्शक नाहीत असे म्हणने अनेकदा संघटनांनी साखर आयुक्तांकडे मांडले आहे. त्याची दखल घेवून साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काटे तपासणीसाठी भरारी पथक नेमण्याचे सुचीत केले आहेत. त्यानुसार आता वैद्यमापन शास्त्र, महसुल, पोलिस विभागाचे अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांचे प्रतिनिधी यांचे संयुक्त भरारी पथक नेमण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या ऊसाचे वजनात काटामारी केली जात असल्याचा शेतकरी संघटनांनी यापुर्वी अनेकदा आऱोप केला आहे. त्याचबरोबर त्यासंदर्भातील निवेदनही अनेकदा देवून काटामारी थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी, साखर आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी संबंधित यंत्रणेककडून त्यासंदर्भात काहीच कार्यवाही होत नाही, असे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करण्यासाठी स्वतंत्र काटा बसवण्याच्याही घोषणा केल्या होत्या. मात्र, साखर आयुक्तांनी शेतकरी संघटनांच्या साखर कारखान्यांकडील काट्यासंदर्भात असलेल्या तक्रारींची दखल घेतली आहे. त्यानुसार साखर आयुक्तांनी त्यासंदर्भातील सुचनाही जारी केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली. गाळप हंगाम सुरु झाल्यावर साखर काऱखान्यांकडून वजन काट्यावर वजन मारले जाते अशा तक्रारी शेतकरी संघटनांकडून प्राप्त झाल्या आहेत.

संबंधित तक्रारींची कार्यवाही होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात भरारी पथकाची स्थापना करावी. त्यामध्ये वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांचे प्रतिनिधी यांचे संयुक्त भरारी पथक नेमण्यात यावे. एखाद्या साखर कारखान्यांवर वजनासंदर्भात गैरप्रकार होत असल्याची तक्रार आल्यास संबंधित यंत्रणा किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यास संबंधित भरारी पथकाने तेथे जावून वजनकाट्याची तपासणी करायची आहे. त्यामध्ये गैरप्रकार होत आहे का? याची शहानिशा करुन त्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास संबंधित यंत्रणेमार्फत कारखान्यावर कार्यवाही करावी. या तपासात काही अनुशंघाने काही गैरकायदेशीर बाबी आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई कऱण्याचेही साखर आयुक्तांनी सुचीत केला आहे.

शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ
शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या ऊसाबाबत त्यांची कारखान्यांच्या वजनासंदर्भात काही तक्रार असल्यास त्यांना तक्रार करण्यासाठी अधिकृत व्यासपिठ नव्हते. साखर आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता हक्काचे व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. त्यांना आता तक्रार करायची असल्यास संबंधित भरारी पथक, जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा पोलिसांकडे तक्रार करता येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news flying squad for weighing of sugar factories