साताराः नागरी वस्तीत बिबट्या दिसल्याने पुन्हा भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): तालुक्यातील वाठार येथे नागरी वस्तीत वावरणाऱ्या बिबट्या व त्याच्या बछडा आज (शुक्रवार) सकाळी शेतकऱ्यांना दिसला. त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण झाले आहे.

नागरी वस्तीत फिरणाऱ्या बिबट्यासाठी वन विभागाने सापळा रचला आहे. त्यात सोमवारी एक बछडा सापडला. उरलेली मादी बिबट व त्याचा बछडा अद्यापही त्या भागात वावरत आहेत. त्यांचे नारायणवाडी व आटके टप्पा परीसरातील शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दर्शन झाले. त्यामुळे येथे भीतीचे वातावरण आहे. पिंजऱ्यात पकडले. मात्र त्या सोबतचा बछडा व त्याची आई विभागात वावरत आहेत.

नारायणवाडी व आटके टप्पा परीसरातील खुडे वस्ती व महिपती गोपाळ पाटील यांच्या माळावरील वस्ती वरील शेतकऱ्यांना दोन बिबटे फिरताना दिसले. सुरेश खुडे व अधिकराव खुडे यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले आहेत. पोपट खुडे यांच्या जनावरांच्या वस्तीवरील मांजर बिबट्याने मारले आहे. पाणी डिल्व्हरी चेंबरच्या शेजारील उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन येथे काम करत असलेल्या शेतकऱ्यांना झाले आहे. वाठारसह याही भागात वनविभागाने सापळा लावून बिबट्याची दोन पिल्ले पकडावीत, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: satara news leopard found in wathar area