मंगळवेढा अपघातात 2 जागीच ठार, रात्रीचा अपघात सकाळीच कळला

हुकूम मुलाणी
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

मध्यरात्री अपघात होऊन सकाळपर्यंत हा अपघात कुणाच्याही नजरेला आला नाही. जवळच्या नागरिकांनी सकाळी पाहिला असता ते दोघे जागीच मृत असल्याचे दिसून आल्यानंतर अपघाताची खबर देण्यात आली.

मंगळवेढा : गोपाळपूरजवळ झालेल्या अपघातात फटेवाडी येथील दोन युवक मृत्युमुखी पडल्याने या अपघाताचे वृत्त समजतात फटेवाडी गावावर शोककळा पसरली, गावातील करते धरते तरुण अपघातात गेल्यामुळे गाव शोकाकूल झाले.

पंढरपूरवरून मंगळवेढयास मध्यरात्री बुलेटवर (क्रमांक एमएच 13 सीई 1001) येत असताना मागून जोरात धडक दिल्याने सीताराम खंडागळे (वय 28) व राहुल वाडदेकर (वय 27) हे दोघे जागीच ठार झाले. मध्यरात्री अपघात होऊन सकाळपर्यंत हा अपघात कुणाच्याही नजरेला आला नाही. जवळच्या नागरिकांनी सकाळी पाहिला असता ते दोघे जागीच मृत असल्याचे दिसून आल्यानंतर अपघाताची खबर देण्यात आली.

फटेवाडी (ता. मंगळवेढा) अपघाताचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरली, त्यांच्या मित्रांनी पंढरपूर व फटेवाडीकडे धाव घेतली अपघातामधील सिताराम खंडागळे हा अविवाहीत असून त्याने मंगळवेढ्यात व पंढरपूरात मनशांत कोड्रीक्स दुकान काढले व्यवसायात नुकताच त्यांने जम बसवून नावलौकीक मिळविला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले. त्याला एक विवाहीत बहीण व आई असून मोलमजुरी करणाय्रा आईचा आधारवड गेला. तर राहूल वाडदेकर हा देखील अविवाहीत असून त्याला आई, भाऊ असा परिवार असून त्यांचे शिक्षण असणारे वडील दोन वर्षापूर्वी हदयविकाराच्या झटक्याने वारले आहेत या दोन तरुणाच्या अपघाती निधनाने गावातील चुलीच पेटल्या नाहीत. दुपारी अडीचच्या दरम्यान फटेवाडीतील शेतात एकाच ठिकाणी   शोकाकुल वातावरणात अंतीम संस्कार करण्यात आले.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: solapur marathi news mangalvedha accident two dead