सोलापूरः उजनीतून सोडले 45 हजार क्‍युसेक पाणी

संतोष सिरसट
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

धरणात 99.67 टक्के भरले; दौंडचा विसर्ग झाला 70 हजार क्‍युसेक

सोलापूर: उजनी धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून 45 हजार 400 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चार वाजता धरणाची उपयुक्त पाण्याची टक्केवारी 99.67 इतकी होती. दौंड येथून धरणात 70 हजार 399 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे.

धरणात 99.67 टक्के भरले; दौंडचा विसर्ग झाला 70 हजार क्‍युसेक

सोलापूर: उजनी धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून 45 हजार 400 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चार वाजता धरणाची उपयुक्त पाण्याची टक्केवारी 99.67 इतकी होती. दौंड येथून धरणात 70 हजार 399 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यामुळे त्या धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येत असल्यामुळे धरण 100 टक्के भरत आहे. दुपारी चार वाजता 99.67 टक्के असलेले धरण काही तासांमध्ये 100 टक्के भरेल. धरणात मागील वर्षी 61.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा धरण खूपच अगोदर 100 टक्के भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने मंगळवारीच दिला होता. आज दुपारपासून जवळपास 41 हजार 500 क्‍युसेकने पाणी भीमा नदीमध्ये सोडले जात आहे. कालव्यातून तीन हजार, बोगद्यातून 900 क्‍सुसेकनेही पाणी सोडले जात आहे. दौंड येथून येणारा विसर्ग जास्त असल्यामुळे नदीपात्रात किंवा कालव्यात पाणी सोडण्याचा वेग वाढविला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

उसाच्या लागवडीत वाढीची शक्‍यता
उजनी धरण हे जिल्ह्याची वरदायिनी आहे. धरण 100 टक्के भरल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आनंदित झाला आहे. उजनी धरणातील पाण्याच्या जोरावर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या ऊस पट्यातील शेतकऱ्यांना धरण 100 टक्के भरल्याने आनंद झाला आहे. आता उसाच्या लागवडीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: solapur news 45 thousand cusecs water left from Ujani