'मी लाभार्थी'ची सोशल मीडियावर खिल्ली 

मीच खरा लाभार्थी
मीच खरा लाभार्थी

सोलापूर : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सरकारकडून वेगवेगळ्या विषयांवरील जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरवात केली आहे. त्यात 'मी लाभार्थी' हे शब्द वापरले आहेत. राज्यातील गरिबांना शासकीय योजनांचा लाभ कसा झाला हे 'मी लाभार्थी' या जाहिरातींमधून दाखविले आहे. मात्र, सोशल मीडियाने सरकारच्या या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे. सरकारमध्ये ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्या मंत्र्यांनाच सोशल मीडियाने 'मी लाभार्थी' बनविले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्‍टोबर 2014 ला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा व राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'सोशल' मीडियाचा प्रभावीपणे वापर केला होता. त्याचा फायदा त्यांना दोन्ही निवडणुकांमध्ये झाला. केंद्रात बहुमत मिळाले तर राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपची गणना झाली. अतिशय कुशलतेने सोशल मीडियाचा वापर भाजपने केला होता. तोच सोशल मीडिया आता सरकारच्या विरोधात जाऊ लागला असल्याचे 'मी लाभार्थी' या जाहिरातीनंतर स्पष्ट झाले आहे.

'मी लाभार्थी' या जाहिरातीमध्ये सरकारने स्वच्छतागृह, जलयुक्त शिवार, भूसंपादन, मागेल त्याला शेततळे, हक्काचं पक्क घर याचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे अनुभव सांगितले आहेत. 'मी लाभार्थी व हे माझे सरकार' असे सांगत त्या लाभार्थ्यांनी सरकारचे कौतुक केले आहे. नेमका हाच धागा पकडत सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. सरकारने केलेल्या या 'मी लाभार्थी' या जाहिरातीचे खरे लाभार्थी कोण आहेत, हेच सोशल मीडियाने दाखविले आहे. त्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. त्या पोस्ट सरकारच्या जिव्हारी लागणाऱ्या आहेत. पण, सोशल मीडिया वापरणारा तरुण त्यातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर 'मी लाभार्थी वाढलेल्या बेरोजगारीचा, मी लाभार्थी वाढलेल्या गुन्हेगारीचा, मी लाभार्थी, वाढलेल्या महागाईचा, मी लाभार्थी न मिळालेल्या मराठा, धनगर, मुस्लिम, आरक्षणाचा, मी लाभार्थी न मिळालेल्या शेतीमाल हमीभावाचा, मी लाभार्थी न लागू झालेल्या स्वामिनाथन आयोगाचा' अशा प्रकारची वाक्‍यही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 

सोशल मीडियावर 'टार्गेट' झालेले मंत्री 
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना सोशल मीडियाने 'टार्गेट' केले आहे. त्यांच्यावर असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपावरून सोशल मीडियाने त्यांना 'मी लाभार्थी' ठरवले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com