शिवसेना- काँग्रेसमध्ये रंगला श्रेयवाद; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मिठाई वाटप | Solapur Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena congress
शिवसेना- काँग्रेसमध्ये रंगला श्रेयवाद; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मिठाई वाटप | Solapur Political News

शिवसेना- काँग्रेसमध्ये रंगला श्रेयवाद; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मिठाई वाटप

सोलापूर : राज्य शासनाच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग(Seventh Pay Commission) लागू झाला. मात्र, सोलापूर महापालिकेतील (SOLAPUR CORPORATION)कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना तो मिळालाच नाही. महापालिकेने पाच महिन्यांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर काहीच कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(minister eknath shinde) यांची भेट घेतली आणि दोन दिवसांत ऑर्डर निघाली.

हेही वाचा: बेशिस्त वाहनांवर आजपासून कारवाई! जागेवर दंड न भरल्यास वाहन जमा

आमदार प्रणिती शिंदे यांनीही नगरविकास विभागाकडे त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. हा निर्णय आमच्यामुळेच झाला, असे काँग्रेसचे पदाधिकारी म्हणू लागले आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर महापालिकेतील कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना तो लागू होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव मागील पाच महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर केला. तत्पूर्वी, सर्वसाधारण सभेत ठराव झाला होता. कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून अनेक राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले.

तरीही, शासनस्तरावरुन काहीच कार्यवाही झाली नाही. कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वानकर यांनी नगरविकास मंत्री शिंदे(minister eknath shinde) यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वानकर यांच्या मागणीवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नगरविकास विभागातून सुधारित आकृतीबंध आणि कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे आदेश निघाले.

मागील आठवड्यात वानकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत कर्मचाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला. मात्र, आमच्या नेत्या आमदार प्रणिती शिंद यांनीही त्यासंदर्भात नगरविकास विभागाच्यासचिवांकडे पाठपुरावा केला होता. तो निर्णय आमच्या नेत्यांमुळेच झाला, असा दावा काँग्रेस पदाधिकारी करू लागले आहेत.दुसरीकडे आम्हीही त्यासाठी पाठपुरावा केला होता, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. परंतु, निवडणुकीपुढे असा श्रेयवाद काही नवा नाही. कामगारांना निश्‍चितपणे माहिती आहे की, हा निर्णय कोणामुळे झाला.

१ जानेवारी २०२१ पासून मिळणार फरक

महापालिकेत जवळपास चार हजार कायम कर्मचारी असून त्यांना आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे(Seventh Pay Commission) पगार मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून हा वेतन आयोग लागू झाला, तरीही त्या कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२१ पासून लाभ मिळणार आहे. दरमहा प्रत्येकी अंदाजित साडेचार ते पाच हजारांचा फरक मिळणार आहे. तत्पूर्वी, त्या कर्मचाऱ्यांची १ जानेवारी २०१६ पासून वेतन निश्‍चिती होईल. त्यानंतर महापालिकेकडून(solapur corporation) हा फरक कामगारांना वितरीत केला जाईल.

Web Title: Shivsena V Congree Fight A Taking Credit Of Seventh Pay Ciomission In Solapur Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top