esakal | दहावी पास विद्यार्थी प्रवेशापासून वंचित नाही राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी पास विद्यार्थी प्रवेशापासून वंचित नाही राहणार

यंदा प्रथमच सीईटी होणार असली, तरी ती ऐच्छिक असल्यामुळे कोरोना काळानंतर बहुतांश विद्यार्थांची मानसिकता ही सीईटी देण्याकडे असणार नाही. हुशार आणि दक्ष पालकांची मात्र सीईटी देण्याकडे कल असणार आहे.

दहावी पास विद्यार्थी प्रवेशापासून वंचित नाही राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : दहावी परीक्षा निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. यंदा ११ वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असली आहे. यंदा दहावी उत्तीण विद्यार्थी संख्या ३९ हजार ६३१ असली, तरी ११ वीच्या सर्व शाखांतील प्रवेश क्षमता ही ३९ हजार ५२०; तर आयटीआय, डिप्लोमा आणि अन्य अभ्यासक्रमांसाठी ८ हजार २०० जागा उपलब्ध असतील. यामुळे प्रवेशापासून कोणी वंचित राहील, अशी परिस्थिती असणार नाही.

हेही वाचा: सांगली बंद उठवण्याबाबत खलबते, रात्री उशीरा निर्णय अपेक्षित

गत वर्षीपेक्षा यंदा २.६ टक्के निकाल जास्त लागला. गेल्या वर्षी ३८ हजार ४७८ विद्यार्थी दहावी पास झाले होते. यंदा ३९ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ एक हजार १५३ विद्यार्थी जादा उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे शाळा प्रवेशाचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे नाहीत. फक्त नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी मात्र झुंबड उडाल्याचे नेहमीचे चित्र यंदाही कायम राहणार आहे. यंदा प्रथमच सीईटी होणार असली, तरी ती ऐच्छिक असल्यामुळे कोरोना काळानंतर बहुतांश विद्यार्थांची मानसिकता ही सीईटी देण्याकडे असणार नाही. हुशार आणि दक्ष पालकांची मात्र सीईटी देण्याकडे कल असणार आहे.

हेही वाचा: सांगली, मिरजेला बस परत; कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त

दहावीनंतर अकरावीसह आयटीआय आणि डिप्लोमासाठी संधी मिळते. कला, वाणिज्य, विज्ञानसह किमान कौशल्य अभ्यासक्रम अकरावी-बारावीला आहे. अकरावीसाठी २३२ कनिष्ट महाविद्यालये (अनुदानित तसेच विनाअनुदानित) आहेत. त्या ठिकाणी ३५ हजार ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. नवोदय पलूस आणि तासगावमधील दादोजी कोंडदेव सैनिक शाळेमध्ये अकरावी आणि बारावी वर्ग आहेत. एकूण दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा दहा हजार जागा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: तासगाव-सांगली रोडवरील कोल्ड स्टोअरेजला भीषण आग

जिल्ह्यात २५ आयटीआय

बहुतांश विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता तंत्र शिक्षणकडे वळतात. जिल्ह्यात दहा शासकीय आयटीआय आणि पंधरा खासगी आयटीआय आहेत. याठिकाणी एक ते दोन वर्षासाठी विविध अभ्यासक्रम शिकविले जात असून, ३ हजार जागा आहेत. याशिवाय डिप्लोमा कॉलेजची संख्या २२ आहे. तेथे मेकॅनिकल, सिव्हील, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन आदी अभ्यासक्रम आहेत. डिप्लोमासाठी ५ हजार २०० जागा उपलब्ध आहेत. अकरावी आणि तंत्रशिक्षणच्या मिळून सुमारे पन्नास हजार जागा आहेत.

हेही वाचा: सांगली - जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

कनिष्‍ठ महाविद्यालय संख्या-२३२

कला शाखा- १९६००

विज्ञान शाखा- १५४४०

वाणिज्य शाखा- ४४८०

आयटीआय क्षमता- ३०००

डिप्लोमा क्षमता -५२००

अन्य प्रवेश-८००

हेही वाचा: सोलापुरात उद्या मराठा आक्रोश मोर्चा ! सांगली, दौंडवरून मागवला पोलिस बंदोबस्त

दहावीचा तुलनात्मक निकाल

--------------------------------

सन २०२० २०२१

----------------------------------

टक्केवारी ९७.२२...९९.९२

परीक्षा दिलेले विद्यार्थी ३८४७८... ३९६५१

पास विद्यार्थी ३७४०२... ३९६३१

तिन्ही शाळांत उपलब्ध प्रवेश ३५,५२०...३५,५२०

आयटीआय, डिप्लोमा ८२००... ८२००

हेही वाचा: कोरोनाकाळ ठरतोय बालविवाहकाळ; सांगली जिल्ह्यात रोखले पंचवीस बालविवाह

डिप्लोमाला जादा प्रवेश: मंत्री सामंत

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा विद्यार्थी संख्या वाढणार आहे. याचा राज्य सरकारने विचार केला आहे. अकरावी शाळा प्रवेशाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच एक घोषणा केली होती. मंत्री सामंत म्हणाले होते की, डिप्लोमाच्या जागा राज्यभर रिक्त राहतात. यंदा सर्व जागा भऱतील, अशी अपेक्षा आहे. त्यापेक्षाही मागणी वाढली तर आणखी जादा प्रवेश वाढवून दिले जातील.

loading image