मुंबई - वांद्रेत सुरू असलेल्या ‘वेव्हज् २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर : पुटिंग इंडिया ऑन द वर्ल्ड स्टुडिओ मॅप’ या चर्चासत्रात अभिनेता आमिर खानने सध्या हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्याच्या कारणांवर स्पष्टपणे प्रकाश टाकला. या सत्रात नमित मल्होत्रा, दिनेश विजन, अजय बिजली, रितेश सिधवानी आणि चार्ल्स रोव्हन यांसारखे नामवंत निर्माते व स्टुडिओ प्रमुख उपस्थित होते.