
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे करोडो चाहते आहेत. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. बघता बघता तो बॉलिवूडचा किंग झाला. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. जगभरात त्याचे चाहते आहेत. संपूर्ण जगात तो फिरून आलाय. पण अशी एक जागा आहे जिथे शाहरुख आजवर गेलेला नाही. ही जागा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणवला जाणारा काश्मीर. शाहरुख जगभरात अनेक ठिकाणी फिरायला मात्र तो काश्मीरला कधीही गेलेला नाही. यामागचं कारण त्याने एका कार्यक्रमात सांगितलं होतं