
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण याने आपल्या बिग बॉसच्या घरात आपल्या वागण्याने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली. त्याचे लाखो चाहते आहेत. याच मंचावर त्याला दिग्दर्शक निर्माते केदार शिंदे यांनी चित्रपटाची ऑफर दिली होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालेलं. आता पुन्हा एकदा तो स्वतःचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झालाय. सुरजच्या पहिल्यावहिल्या 'झापुक झुपूक' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय.