
सध्याच्या बदलत्या जगात स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. मात्र त्यातही कामामध्ये महिलांना आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे मासिक पाळीची. अनेक महिला त्या पाच दिवसांमध्येही काम करताना दिसतात. स्वतःला कामात गुंतवून घेताना दिसतात. अभिनेत्री देखील याला अपवाद नाहीत. मात्र अशी एक अभिनेत्री आहे जी तिच्या पाळीच्या दिवसात अजिबात काम करत नाही. तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली आहे.