'अलविदा पुणे'; अफगानिस्तानच्या 143 नागरिकांनी घेतला पुण्याचा निरोप!

Afghanistan-Airlines
Afghanistan-Airlines

पुणे : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे शहर आणि परिसरात अडकलेल्या 143 नागरिकांना अफगनिस्तान सरकार एका खास विमानाद्वारे रविवारी (ता.17) दुपारी लोहगाव विमानतळावरून घेऊन गेले. अफगनिस्तानात अडकलेल्या 9 भारतीयांनाही त्यांनी पुण्यात सोडले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), तसेच शहरातील लष्करी संस्थांत प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी, जवान, पुण्यात शिकत असलेले विद्यार्थी तसेच काही व्यावसायिक रविवारी अफगनिस्तानला परतले. अफगाण सरकारचे काम एअरलाईन्सचे खास विमान त्यासाठी रविवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी लोहगाव विमानतळावर उतरले. त्यातून भारतीय 9 नागरिक उतरले. त्यानंतर 143 अफगानी नागरिक विमानात बसले. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी ते विमान काबूलसाठी रवाना झाले.

केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे या बाबत म्हणाल्या, 9 भारतीयांना आणून 143 अफगाण नागरिकांना परत पाठविण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे. आलेल्या व पाठविण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची वैद्यकीय चाचणी यशस्वीपणे करण्यात आली. अफगनिस्तानला परतण्यासाठी पुण्याशिवाय पाचगणी, गोवा, बंगळूर येथील नागरिकही पुण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात आलेल्या प्रवाशांपैकी एकाला कफचा त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, असेही पतंगे यांनी सांगितले.

अफगानिस्तानला जाण्यासाठी 147 प्रवासी आले होते. परंतु, विमानाची क्षमता 143 असल्यामुळे चार प्रवाशांना जाता आले नाही. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था काही करता येईल का, या बाबत प्रयत्न सुरू आहेत. सीमा शुल्क विभाग, भारतीय विमानतळ प्राधिकरण, इमिग्रेशन, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे एअरलिफ्ट झाले, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com