भाजपकडील राज्यातच CAA, NRC ला विरोध : सचिन पायलट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

देशात असे काय घडते आहे ? ज्यामुळे हे सरकार आक्रमक होऊन "CAA' लादत आहे. आर्थिक स्थिती बिघडत आहे. त्यावर उपाय करण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि शहा हे दिशाभूल करीत आहेत, '' असा टोलाही पायलट यांनी लगावला. 

पुणे : भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद असलेल्या राज्यांत नागरिकत्व दुरुस्ती (CAA) आणि नागरिक नोंदणी कायद्यांना विरोध होतो आहे. तेव्हा इतर राज्यांत हे कायदे अंमलात कसे येतील ? असा प्रश्‍न काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गुरुवारी पुण्यात मोदी सरकारला विचारला. राजस्थानात हा कायदा लागू करणार नसल्याचेही त्यांना ठामपणे स्पष्ट केले. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार

पुणे दौऱ्यावर आलेल्या पायलट यांनी काँग्रेस भवनला भेट देऊन माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे, अभय छाजेड आदी उपस्थित होते. देशभरात "CAA' आणि "NRC' लागू करण्याची भाजपची घाई, त्याचे पडसाद, कायद्यातील तरतूदी, भविष्यातील परिणाम आणि वस्तुस्थिती आदी मुद्दे मांडत पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कारभाराकडे अंगुलीनिर्देश केला. 

महत्त्वाचे! मुंबई-पुणे प्रवास करत असाल तर ही बातमी वाचलीच पाहिजे

पायलट म्हणाले,"धर्माचा आधार घेत भाजप सरकारने "CAA'ला मंजुरी दिली आहे. हे सरकार आपल्या मातृ संस्थेचा अजेंडा राबवत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत. परंतु, सराकर गंभीर नाही. धर्मनिरपेक्ष पुरस्कार करणाऱ्या आपल्या देशात धर्मावर आधारित कायदे करणे अन्यायकारक आहे. त्यामुळेच सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन या कायद्याला प्रचंड विरोध करीत आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी हे सरकार गप्प राहात आहे. त्याचाच अर्थ सरकारमधील काही लोकांत नाराजी असल्याचे दिसते आहे. '' 

Video : अखेर, ढगाळ वातावरणातही पुणेकरांना दिसलं सूर्यग्रहण

देशात असे काय घडते आहे ? ज्यामुळे हे सरकार आक्रमक होऊन 'CAA' लादत आहे. आर्थिक स्थिती बिघडत आहे. त्यावर उपाय करण्याऐवजी पंतप्रधान मोदी आणि शहा हे दिशाभूल करीत आहेत, '' असा टोलाही पायलट यांनी लगावला. 

पिंपरीत पोलिस निरिक्षकाच्या मुलाची आत्महत्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA NRC opposed in BJP state said Sachin Pilot