Sakal Maha Conclave : अमित शाह जास्त बोलत नाहीत, फटक्यात काम करतात - एकनाथ शिंदे

Sakal Maha Conclave :
Sakal Maha Conclave :

पुणे : सकाळ आयोजीत सहकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सकाळ माध्यम समुहाचे कौतुक केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेतून काही तर चांगल घडेल. सहकारी चळवळीचे विकासात मोठे योगदान आहे. अमित शाह यांना ज्यावेळी अडचणी सांगितल्या त्यावेळी त्यांनी सांगितले, हो जाएगा. ते जास्त बोलत नाहीत. फटक्यात काम करून टाकतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना विनंती केली. ते म्हणाले, "महाराष्ट्र साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानी आहे, निर्यात निर्बंधांकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्राला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. साखर निर्यात बाबत देखील निर्णय घेऊ. तुमच्या सहायोगाची अवशक्ता आहे. राज्य सरकार देखील तुमच्या मार्गदर्शनात काम करत आहे. सहकार क्षेत्रात अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली क्रांती होईल. राज्य सरकार पण यात सहकार्य करणार."

Sakal Maha Conclave :
ShivSena Row: आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

महाराष्ट्र विकासाच्या सोबत आहोत असे आश्वासन अमित शहा यांनी दिले होते. जेवढं सांगितल त्या पेक्षा जास्त त्यांनी दिले आहे, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, "फक्त बातम्या न देता सकाळने विविध उपक्रम घेतले आहेत. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेने सकाळचे काम सुरू असते. कोरोना काळात देखील सकाळ माध्यम समुहाने चांगले काम केले. ही परिषद राज्याच्या आणि देशाच्या विकासाच्या दुष्टीकोणातून महत्वाची आहे. सहकार चळवळ आणि महाराष्ट्र यांचे जवळचे नाते आहे. हे विकास घडवणारं नात आहे."

Sakal Maha Conclave :
Shivsena Row : EC, ED अन् CBI नंतर भाजपचं पुढचं लक्ष...; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com