साडे अठरा हजार विद्यार्थांचे 'डीबीटी' अर्ज प्रलंबित

MahaDBT.jpg
MahaDBT.jpg

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. मात्र, अद्याप पुणे विभागातील 18 हजार 770 विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थांच्या स्तरावरच अकडून पडले आहेत. ही कारवाई त्वरीत पूर्ण करावी, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास महाविद्यालय/विद्यापीठाला जबाबदार धरले जाईल, असे उच्च शिक्षण संचालनालयाचे स्पष्ट केले आहे.

पुण्याचा महापौर तयारीचाच हवा! 

जुलै-ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने विवध प्रकारच्या शिष्यवृत्ती देऊन त्यांना सहकार्य केले जाते. उच्च शिक्षण संचालनालयातर्फे महाविद्यालये व विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 14 शिष्यवृत्ती सुरू आहेत. शिष्यवृत्ती वाटपात घोळ होत असल्याने शासनाने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी 'डीबीटी' पद्धत सुरू केली. त्यासाठी 'महाडीबीटी' पोर्टल सुरू केले आहे.

#TransportIssue पुण्यातील अपघातांची संख्या घटली

डीबीटी करण्यापूर्वी महाविद्यालयांनी पोर्टलवर प्रोफाईल तयार करून घेऊन संबंधित अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीस शिक्षण शुल्क समितीची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लिपीक व प्राचार्यांच्या स्तरावर अर्जांची पडताळणी करून त्यांना अंतीम मान्यता दिली जाते.

पुणेकरांनो, उद्यापासून वाहतूकीत होणार 'हे' बदल कारण... 

शिक्षण शुल्क समितीची मान्यता घेणे व विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरूण घेण्यासाठी 15 नोव्हेंबरची मुदत होती. त्यानंतर 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यापीठ, महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगईनवर अर्जांची पडताळणी करून अनिवार्य आहे. पुणे विभागातील 40 हजार 611 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर अद्यापही 18 हजार 770 महाविद्यालय/ विद्यापीठ स्तरावर प्रलंबित आहेत.

महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार घुसली टॉयशॉपमध्ये; एका महिलेचा मृत्यू  

विद्यार्थ्यांचे अर्ज आले की, त्वरीत त्याची पडताळणी करणे आवश्‍यक आहे. अर्ज प्रलंबित राहिल्याने एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठांचे कुलसचिव यांना जबाबदार धरले जाईल, असे पत्र उच्च शिक्षण संचालनालयाचे सर्व काढले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com