'कर्जमाफीबाबत 'भीक नको पण कुत्रं आवर' अशी परिस्थिती'

दत्ता म्हसकर
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वयस्कर शेतकऱ्याचे आधार कार्ड नाहीत. तर शेतात काम करून हाताचे ठसे नाहीसे झाल्याने मशीनमध्ये ठसे येत नाहीत अशांचा अर्ज कसा भरायचा हा प्रश्नच आहे. तर या वर्षी एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला कर्जमाफीचे लाभ मिळेल का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

जुन्नर : शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरताना 'भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे कृषीनिष्ठ शेतकरी जितेंद्र बिडवई यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

काही ठिकाणी तर पैशाची मागणी होत असल्याची चर्चा आहे. सध्या शेतकऱ्याची खरिपाची कामे सुरू असून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी त्याचे दोन दोन दिवस जात असल्याने शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने दुहेरी नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन अर्ज भरणे जिकरीचे झाले आहे.

वयस्कर शेतकऱ्याचे आधार कार्ड नाहीत. तर शेतात काम करून हाताचे ठसे नाहीसे झाल्याने मशीनमध्ये ठसे येत नाहीत अशांचा अर्ज कसा भरायचा हा प्रश्नच आहे. तर या वर्षी एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला कर्जमाफीचे लाभ मिळेल का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. एकूण कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: farmer statement on farmer loan waiver