esakal | 'एचए'कंपनी सुरु करणार 'अॅल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंट' उत्पादन  
sakal

बोलून बातमी शोधा

HA Company will launch 'Alcoholic Hand Disinfectant' product

पिंपरी येथे एचए कंपनीची स्थापना झाल्यावर सुरुवातीच्या काळात पेनिसिलीनचे उत्पादन केले जात असे. त्यामुळे, कंपनीकडे पेनिसिलीन उत्पादनांचा कारखाना म्हणून पाहिले जात होते. त्यानंतर, इतर जीवरक्षक औषधे, कृषी आणि पशुचिकित्सा विषयक औषधांची निर्मिती आणि विक्री सुरु झाली. तेव्हापासून, देशभरात कंपनीच्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो. 'एचए'ने आता हात निर्जंतुकपणे धुण्यासाठी, "ऍल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंट'चे उत्पादन सुरु करण्याचे ठरविले आहे. 

'एचए'कंपनी सुरु करणार 'अॅल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंट' उत्पादन  

sakal_logo
By
सागर शिंगटे

पिंपरी : हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून कंपनीतील चार बंद प्रकल्प परत सुरु करण्यात आले आहेत. तर येत्या एप्रिल महिन्यापासून 'अॅल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंट'चे उत्पादन सुरु करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी किंमतीत हे उपलब्ध राहणार आहे. 

महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डात रताळांची आवक वाढणार 

पिंपरी येथे एचए कंपनीची स्थापना झाल्यावर सुरुवातीच्या काळात पेनिसिलीनचे उत्पादन केले जात असे. त्यामुळे, कंपनीकडे पेनिसिलीन उत्पादनांचा कारखाना म्हणून पाहिले जात होते. त्यानंतर, इतर जीवरक्षक औषधे, कृषी आणि पशुचिकित्सा विषयक औषधांची निर्मिती आणि विक्री सुरु झाली. तेव्हापासून, देशभरात कंपनीच्या उत्पादनांचा पुरवठा केला जातो. 'एचए'ने आता हात निर्जंतुकपणे धुण्यासाठी, "ऍल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंट'चे उत्पादन सुरु करण्याचे ठरविले आहे. 

चिकन बिनधास्त खा, कोरोनाशी संबंध नाही!

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ म्हणाल्या,"एचए कंपनीला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीतील टॅबलेट, कॅप्सुल्स, पावडर इन्जेक्‍टेबल्स आणि आयव्ही हे चारही बंद पडलेले प्रकल्प नव्याने सुरु करण्यात आले आहेत. 2016-17 च्या तुलनेत 2018-19 या आर्थिक वर्षांत कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. आता कंपनीने अॅल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंट'चे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न व औषधे प्रशासन (एफडीए) कडून परवानगी मिळाली असून एप्रिल महिन्यापासून हे उत्पादन सुरु केले जाणार आहे. दरवर्षी 30 लाख बाटल्यांचे उत्पादन करण्याचे कंपनीचे नियोजन राहणार आहे.'' 

Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने

देशात राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए)मार्फत औषधांच्या किंमती निश्‍चित केल्या जातात. सध्या बाजारपेठेत खासगी कंपन्यांचे ऍल्कोहोलिक हॅंड डिस इन्फेक्‍टंटच्या किंमती 500 एमएलसाठी 400 ते 450 रुपये तर 100 एमएलसाठी 180 रुपयांच्या आसपास आहेत. तर "एचए'च्या याच उत्पादनाच्या किंमती अनुक्रमे 168 रुपये आणि 49 रुपये इतक्‍या राहणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
"देशभरातील इतर राज्यांकडून "एचए'च्या शेतीवरील रोग प्रतिबंधक औषधांची मागणी आहे. मात्र, राज्य सरकारकडून या प्रकारच्या औषधांची खरेदी होत नाही. राज्य सरकारने ही औषधे खरेदी केल्यास दर्जेदार आणि कमी किंमतीत ती शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतील'',
- नीरजा सराफ, व्यवस्थापकीय संचालिका 

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

तर 'व्हीआरएस' लागू करण्याची गरज भासणार नाही ! 
'एचए'कंपनीत सध्या 650 कामगार आहेत. केंद्र सरकारकडून पुरेशी आर्थिक मदत आणि विविध राज्य सरकारांकडून उत्पादनांसाठी नियमित मागणी राहिल्यास स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू करण्याची गरज भासणार नाही. तसेच त्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍नही उद्‌भविणार नाही, असा विश्‍वासही नीरजा सराफ यांनी व्यक्‍त केला.


पुणे विद्यापीठाच्या ‘आंतरराष्ट्रीय’तेला धक्का

loading image