Fight With Corona : पुण्यात पहिल्या रुग्णापासून कोरोनाग्रस्तांची सेवा करतेय 'डॉक्टर नवदाम्पत्य'!

the newly wed doctor Couple has been serving since the corona virus infected first patient of Pune.jpg
the newly wed doctor Couple has been serving since the corona virus infected first patient of Pune.jpg

पुणे : पती-पत्नी दोघेही एमबीबीएस झालेले. पुढे पतीने हाडांचे विकार या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुर्ण केले. सध्या दोघेही राज्याच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारीपदी कार्यरत आहेत. दोघांची नोकरी आणि लग्नही नवीनच. शिवाय यापैकी पत्नी वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. अशातच राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुणे शहरात सापडला आणि राज्य सरकारने तातडीने या  दोघांची नियुक्ती पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी केली. गेल्या दीड महिन्यांपासून हे दाम्पत्य कोरोनाविरुध्द लढाई निकराने लढत आहे. या नवदाम्पत्याचे नाव आहे डॉ. निखिल गोरे आणि डॉ. ऋतुजा चव्हाण-गोरे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेष म्हणजे राज्यातील पहिला कोरोना रुग्ण हाही एकटा नव्हता. तर तेही एक दांम्पत्यच होते. हा योगायोग म्हणावा लागेल. पहिल्या कोरोना रुग्णापासून आजतागायत नायडू रुग्णालयातील प्रत्येक कोरोना रुग्णांची तपासणी, उपचार करण्यात या नवदाम्पत्याचा सहभाग आहे.  मात्र हे दाम्पत्य केवळ उपचारच नव्हे तर तेथील प्रत्येक कोरोना रुग्णाला भावनिक आणि मानसिक आधार देण्याचे कामही सातत्याने करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दाम्पत्यापैकी पती डॉ. निखिल गोरे यांची मूळ नियुक्ती बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदी तर, पत्नी डॉ. ऋतुजा यांची नियुक्ती ही बारामतीमधीलच महिला ग्रामीण रुग्णालयात आहे. या दोघांचीही फक्त कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) नायडू रुग्णालयात तात्पुरती नियुक्ती करण्यात  आली आहे. १० मार्चपासून एकही सुट्टी न घेता हे दाम्पत्य नायडूमध्ये  अखंडपणे कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. पुर्णवेळ सेवा देता यावी, यासाठी नायडूत नियुक्ती होताच शिक्षणासाठी पुण्यात आणलेल्या लहान बहिणीला त्यांनी १० मार्चलाच अंबाजोगाई येथे स्थायिक असलेल्या  आई-वडिलांकडे पाठवले आहे. 

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

मुळचे दोघेही दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या  मराठवाड्यातील आहेत. डॉ. निखिल हे बीड जिल्ह्यातील बनसारोळा (ता. केज) येथील तर, डॉ. ऋतुजा या उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगाव (ता. वाशी) येथील आहेत.

स्ट्रेस कमी करायचाय? घरबसल्या करा ऑनलाईन योग ध्यानसाधना

डॉ. निखिल यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी तर, त्यानंतर पुणे येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधून हाडांचे विकार या विषयात पदव्युत्तर पदवी (एम. एस.ऑर्थो.) पुर्ण केली आहे. डॉ. ऋतुजा यांनी लातूर येथील एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी पुर्ण केली आहे. निखिल यांचे वडिल जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता तर आई शिक्षिका आहेत.

पुण्यात पाय ठेवताच घरच्यांना बघून आले गहिवरून; कोटाहून परतलेल्या विद्यार्थ्यांची आपबिती

''कोरोना रुग्णांना औषधोपचारापेक्षा भावनिक आणि मानसिक आधाराची अधिक गरज भासत असते. यामुळे रुग्णांचा आत्मविश्र्वास वाढतो. त्यामुळे आम्ही दोघेही औषधौपचाराबरोबरच त्यांना भावनिक व मानसिक आधार देत आहोत. रुग्ण बरे होत आहेत, याचे समाधान आहे.''
- डॉ. निखिल व ऋतुजा गोरे,  डॉ. नायडू रुग्णालय, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com