Video : पोलिसवाला नाकाने काढतोय 'हे' आवाज; पाहा कोण आहे ते?

Police Inspector Salim Mujawar Sing song through Nose Pune
Police Inspector Salim Mujawar Sing song through Nose Pune

पुणे : पोलिस खात्यात अनेक कलाकार आहेत पण त्यांची कला समोर येत नाही. कलेवर प्रेम करणारे अनेक आहेत मात्र, आपली नोकरी व कर्तव्य सांभाळत कला सादर करणारे फौजदार सलीम मुजावर सध्या सोशल मीडियावर चर्चात आले आहेत. नाकाने बासरी वाजवत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 



चालक हॅन्डब्रेक न लावताच बसमधून उतरला अन् उतरावरुन...

प्रत्येक व्यक्‍तीत कोणते ना कोणते सुप्त अथवा जागृत कलागुण असतात. परंतु, आयुष्याच्या धावपळीत या कलागुणांना जोपासणे अशक्‍य होते. विशेषतः पोलिसाची नोकरी करणाऱ्या कलाकारांची कला अर्ध्यातच राहून जाते. परंतु काही अधिकारी असेही असतात जे आपल्या अहोरात्र व्यस्त दिनचर्येतही आपली कला जिवंत ठेवतात. त्यापैकीच एक आहेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार सलीम यासीन मुजावर. घरात संगीतमय वातावरण असत 5 भाऊ आहेत सर्व पोलीस मध्ये आहोत मात्र सर्व कलाकार आहेत .सर्व आपली कला सादर करतात.

...म्हणूून भोंदूबाबाने केला पाच बहिणीवर लैंगिक अत्याचार

सलीम मुजावर एक आगळे-वेगळे आणि अवलिया कलाकार आहेत. नाकाने बासरी व सनईचा आवाज काढणे, एकाच वेळी नाकाने दोन बासऱ्य़ांनी गाणे वाजवणे, ओठ न हलवता नाकाने गाणे, तोंडाने ढोलकीचा व ऑर्केस्ट्राचा आवाज तसेच राजेश खन्ना यांचे हुबेहूब गाणे, अभिनय अशा कित्येक कलांनी त्यांनी छंद म्हणून जोपासले आहे. सलीम मुजावर जणू काही कलेचे एक पूर्ण पॅकेज आहे. पोलिस खात्यात असूनही कला जोपासण्याचे त्यांचे कार्य अविरत सुरु आहे. 

सहाय्यक पोलीस फौजदार सलीम यासीन मुजावर ( वय 56, रा. देहूरोड पोलीस वसाहत मूळ विटा ता.मायणी जि. सांगली) 22 ऑक्‍टोंबर 1980 साली पुणे ग्रामीण पोलीस दलात सासवड (पुणे) पोलिस ठाण्यात नोकरीला सुरुवात केली. सलीम यांचे वडील पोलीस खात्यात होते. सलीम यांना पाच भाऊ असून ते सर्वच पोलीस खात्यात आहेत. पाचही भाऊ कलाकार आहेत. कोणी भजनात पारंगत तर कोणी कव्वाली, चित्रपट गीत, अभिनय आदी कलेत पारंगत आहेत.त्यात सलीम मुजावर यांच्या कलेचे नाकाने बासरी व सनईचा आवाज, एकाच वेळी नाकाने दोन बासऱीने गाणे वाजवणे, ओठ न हलवता नाकाने गाणे, तोंडाने ढोलकीचा व ऑर्केस्ट्राचा आवाज तसेच राजेश खन्ना यांचे हुबेहूब गाणे, अभिनय कार्यक्रम टीव्हीवरील विविध वाहिन्यांवर झाले आहेत.  पोलीस खात्यात त्यांची ओळख कलाकार म्हणून आहे. 


सलीम मुजावर म्हणाले, ''माझे वडील कलाकार होते त्यांची कला जोपासण्याचा वारसा मी जपला. सर्वच नातेवाईक पोलीस खात्यात आहे. कलेतून मिळालेल्या मानधनातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी मानधनातून खर्च करतो. अनेक गरीब, गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा सदैव हात देतात. ''

''भाजी विकू नको सांगितले'' म्हणून भाजीवाल्याचा आठ पैलवानांसह सोसायटीत राडा

पोलिस ठाण्याच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी सलीम यांच्या मैफलीत रमतात. अजून नोकरी एक वर्ष बाकी आहे 2 जण पोलिस खात्यातून निवृत्त झालेत रिटायर झाल्यावर कला जपणार अस ते सांगतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com